अर्धशतकासाठी विराटला स्ट्राईक का नाही दिली? अखेर Dinesh Karthik ने केला खुलासा!

संधी असूनही दिनेश कार्तिकने विराटला स्ट्राईक दिला नाही आणि 1 रनमुळे त्याचं अर्धशतक चुकलं. 

Updated: Oct 3, 2022, 10:26 AM IST
अर्धशतकासाठी विराटला स्ट्राईक का नाही दिली? अखेर Dinesh Karthik ने केला खुलासा! title=

गुवाहाटी : गुवाहाटीधील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेला सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला. हा सामना जिंकून टीमने दक्षिण आफ्रिकेला घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केलं. या सामन्यात विराट कोहलीचं अर्ध शतक एका रनने हुकलं. संधी असूनही दिनेश कार्तिकने विराटला स्ट्राईक दिला नाही आणि 1 रनमुळे त्याचं अर्धशतक चुकलं. 

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली भारतीय डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 49 रन्सवर फलंदाजी करत होता. कागिसो रबाडाच्या 20 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक स्ट्राइकवर होता. कार्तिकने पहिल्या 4 बॉल्समध्ये 11 रन्स केले. दरम्यान विराटला स्ट्राईक न दिल्याबाबत कार्तिकने खुलासा केला आहे.

दिनेश कार्तिक म्हणाला, विराटला अर्धशतकासाठी 1 रन हवाय ही गोष्ट त्याच्या डोक्यात सुरु होती. शेवटच्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर सिक्स मारल्यानंतर तो विराटकडे आला आणि स्ट्राईक रोटेट करण्यासाठी सांगितलं. पण विराटने कुठलाही स्वार्थ न ठेवता देशाचा विचार करत कार्तिकला स्ट्राईक रोटेट करण्यासाठी नकार दिला.

उरलेल्या ओव्हरमध्ये जमेल तितक्या चेंडूत रन्सच करण्यास त्याने कार्तिकला सांगितलं. त्यावेळी कार्तिकने पुढच्याच बॉलवर आणखी एक सिक्स ठोकला. त्यामुळे टीम इंडियाने शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्स निघाले आणि दक्षिण आफ्रिकेला 238 रन्सचं लक्ष्य दिलं.

सूर्यकुमार आणि विराटची तुफान खेळी

फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळी खेळली. मैदानावर येताच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 बॉलमध्ये 61 रनची तुफानी खेळी केली.

विराट कोहलीनेही (Virat Kohli) आफ्रिकन गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. दोन्ही खेळाडूंमध्ये अवघ्या 42 चेंडूत 102 धावांची शतकी भागीदारी पाहायला मिळाली. युजर्स या जोडीचे भरभरून कौतुक करत आहेत. विराच कोहलीने 49 रनची खेळी केली.