ENG vs AUS: वास घेतो की कॅच घेतो? कॅरीने विचित्र पद्धतीने पकडला बॉल; Video तुफान व्हायरल

Alex Carey Catch Video: मार्क वूडने (Mark Wood) पहिल्याच दिवशी 5 विकेट घेत कांगारूंचं कंबरडं मोडलं. मात्र, पहिल्या दिवशी सर्वांत मनोरंजक काही राहिलं असेल तर ते म्हणजे विकेटकिपर अॅलेक्स कॅरीचा कॅच...

Updated: Jul 7, 2023, 04:27 PM IST
ENG vs AUS: वास घेतो की कॅच घेतो? कॅरीने विचित्र पद्धतीने पकडला बॉल; Video तुफान व्हायरल title=
Alex Carey Catch Video

Eng vs Aus 3rd Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5 कसोटी अॅशेस मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले (Headingley) इथं खेळवला जात  आहे. या सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो मार्क वूड आणि मिशेल मार्श (Mitchell Marsh) यांनी. घातक गोलंदाजी करत दोन्ही संघाने फलंदाजीचं कंबरडं मोडलं. पहिल्याच दिवशी 13 विकेट घेण्याचा विक्रम मोडीस निघाला आहे. मार्क वूडने (Mark Wood) पहिल्याच दिवशी 5 विकेट घेत कांगारूंचं कंबरडं मोडलं. मात्र, पहिल्या दिवशी सर्वांत मनोरंजक काही राहिलं असेल तर ते म्हणजे विकेटकिपर अॅलेक्स कॅरीचा कॅच... 

नेमकं काय झालं?

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची बत्ती गुल केली. पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना कांगारूंचा संघ 263 धावांवर बाद झाला. त्यानंतर आता इंग्लंड बाजी मारणार का? असा सवाल उपस्थित होता. ऑस्ट्रेलियाने पहिला धक्का दिला तो सलामीवीर बेन डकेत याच्या रुपात. तिसऱ्याच ओव्हरमध्ये कॅप्टन कमिन्सने बेनला बाद केलं. त्यावेळी विकेटकिपर अॅलेक्स कॅरीने (Alex Carey Catch) अप्रतिम कॅच पकडला. बॅटचा एज लागल्यानंतर कॅरीने बॉल पकडला. त्यावेळी त्याच्याकडून बॉल सुटणारच होता. त्यावेळी त्याने नाकाचा आणि हनुवटीचा आधार घेत कॅच पकडला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

पाहा Video

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 263 धावांवर बाद झाला. त्यावेळी मिशेल मार्शने 118 धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही. मार्क वूडने 5 तर ख्रिस वोक्स 3 विकेट काढल्या. तर ब्रॉडने देखील 2 दांड्या उडवल्या. त्यानंतर 264 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची दैना उडाल्याचं पहायला मिळतंय. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, 95 धावांवर इंग्लंडच्या 5 विकेट गेल्या आहेत.

काय म्हणाला मार्क वूड?

माझ्या घरच्या परिस्थितीत मी चांगली गोलंदाजी करू शकलो, याचा मला खूप आनंद आहे. मी बऱ्याच काळापासून एकही कसोटी सामना खेळलो नव्हतो आणि आता मी माझ्या संघाच्या विजयात पूर्ण ताकदीने योगदान देऊ इच्छितो आणि ते माझ्यासाठी खूप खास असेल, असं मार्क वूड म्हणाला आहे.

पाहा दोन्ही संघ

इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (WK), बेन स्टोक्स (C), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड.

ऑस्ट्रेलियाचा संघ - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (WK), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.