Asia Cup 2022 : आशिया चषकापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका; पुढची वाट खडतर?

संघातील खेळाडूंसाठीही ही बाब चिंता वाढवणारी 

Updated: Aug 23, 2022, 11:31 AM IST
Asia Cup 2022 : आशिया चषकापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका; पुढची वाट खडतर? title=
Rahul Dravid Tested Covid-19 Positive

Asia Cup 2022 : आशिया चषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका लागला आहे. संघाच्या दृष्टीनं ही चिंता वाढवणारी बाब आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी असणाऱ्या राहुल द्रविडला कोरोनाची लागण छाली आहे. आशिया चषकासाठी राहुल द्रविड जाऊ शकणार की नाही यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Rahul Dravid Tested Covid-19 Positive)

27 ऑगस्ट, म्हणजेच शनिवारपासून आशिया चषकाची सुरुवात होत आहे. ज्यासाठी भारतीय संघ आज (मंगळवारी) युएईला रवाना होत आहे. 28 ऑगस्ट रोजी तिथं भारताचा पहिला सामनाही खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध मैदानात उतरणार असल्यामुळं क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. 

काही दिवसांच्या विश्रांतीवर होता द्रविड 

वेस्ट इंडिजविरोधात हल्लीच झालेल्या मालिकेनंतर प्रशिक्षक द्रविड काही दिवसांसाठी संघापासून दूर होता. विश्रांतीसाठी त्यानं हा वेळ दिला होता. दरम्यानच्या काळात के.एल. राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी गेला. तिथं राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NIA) संचालक, VVS Laxman यानंसंघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत संघाला मोठा आधार दिला. 

सध्याची परिस्थिती पाहता द्रविड कोरोना पॉझिटीव आढळल्यामुळं त्याच्या आशिया चषकातील उपस्थितीवर सावट आल्याचं कळत आहे. कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरही प्रकृती सुधारत नाही, तोवर त्याला संघासोबत उपस्थित राहता येणार नाहीये. परिणामी राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मणकडे संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.