FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे. 

Updated: Nov 20, 2022, 10:35 AM IST
FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live? title=
FIFA World Cup Qatar 2022 reliance jio launches 5 new plans

FIFA World Cup Qatar 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) आजपासून कतारमध्ये रंगणार आहे. अशा परिस्थितीत, भारतातील अनेक वापरकर्ते आहेत जे फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाण्याचा विचार करत आहेत आणि बरेच लोक आधीच गेले आहेत. अशा लोकांसाठी जिओने काही खास इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन (International Roaming Plan) आणले आहेत. जेणेकरून फिफा वर्ल्ड कप पाहताना त्यांचे मोबाईल बिल वाढणार नाही. चला तर मग जाणून घेऊया Jio च्या या प्लानबद्दल...

या योजना तीन देशांमध्ये चालतील

जिओचे हे प्लॅन कतार, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये लागू होतील. Jio ने 5 नवीन इंटरनॅशनल रोमिंग (IR) प्लॅन लाँच केले आहेत. Jio च्या या नवीन प्लॅनच्या किंमती 1122 रुपये, 1599 रुपये, 3999 रुपये, 5122 रुपये आणि 6799 रुपये आहेत. हे सर्व प्लॅन खास फिफा वर्ल्ड कप कतार 2022 साठी लाँच करण्यात आले आहेत.

पहिल्या श्रेणीतील दोन योजना

जिओने हे पाच नवीन प्लॅन दोन श्रेणींमध्ये लॉन्च केले आहेत. एकामध्ये, IR सह फक्त डेटा फायदे उपलब्ध आहेत. तर इतर तीनमध्ये IR सोबत म्हणजेच आंतरराष्ट्रीय रोमिंग, डेटा आणि इतर अनेक फायदे दिले आहेत.
या श्रेणीतील पहिला प्लॅन 1122 रुपयांचा आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना 5 दिवसांच्या वैधतेसह 1 GB डेटा मिळतो.
या श्रेणीतील दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत 5,122 रुपये आहे. या प्लॅनची ​​वैधता 21 दिवस आहे आणि यूजर्सना आंतरराष्ट्रीय रोमिंगसह 5GB इंटरनेट डेटा मिळतो.

वाचा: FIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?

दुसऱ्या श्रेणीतील तीन योजना

जिओच्या या तीन आयआर प्लॅनमध्ये यूजर्सना इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा तसेच डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय यूजर्सना या तीन प्लॅनमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
या श्रेणीचा पहिला प्लॅन 1599 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 1GB डेटा, 150 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस 15 दिवसांच्या वैधतेसह मिळतात.
या यादीतील दुसरा प्लॅन 3,999 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 3GB डेटा आणि 250 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 30 दिवसांच्या वैधतेसह 100 मोफत एसएमएस मिळतात.
या यादीतील तिसरा आणि शेवटचा प्लॅन 6799 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह 5GB डेटा आणि 500 ​​मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतात.