FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये कोण जिंकणार Golden Boot Award?

 चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. सोबतच यंदाचा गोल्डन बूट कोणाच्या खात्यात जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated: Dec 18, 2022, 06:03 PM IST
FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये कोण जिंकणार Golden Boot Award? title=

FIFA World Cup 2022: अर्जेंटीना आणि फ्रान्स (Argentina Vs France) यांच्यामध्ये फीफा वर्ल्डकप 2022 चा फायनल सामना आज रंगणार आहे. कतारच्या  Lusail Stadium मध्ये हा सामना खेळवला जाणार असून दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. सोबतच यंदाचा गोल्डन बूट कोणाच्या खात्यात जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये कोण जिंकणार गोल्डन बूट?

फिफा वर्ल्डकप 2022 च्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्जेंटीना स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी आणि फ्रान्सचा खेळाडू कायलियन एम्बाप्पे या दोघांचे 5-5 गोल्स झाले आहेत. जर लियोनेल मेस्सी गोल्डन बूटचा अवॉर्ड जिंकला तर, हा त्याच्या वर्ल्डकपच्या करियरमधील पहिला गोल्डन बूट असेल. दोन्ही खेळाडूंचे या टूर्नामेंटमधील 5-5 गोल्स असणार आहेत. 

कोण कोरणार वर्ल्डकपवर नाव?

अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन टीम्सने धडक मारली आहे. मुख्य म्हणजे, मेस्सीची टीम आणि एम्बाप्पेची टीम या दोन्ही तुल्यबळ असल्याने वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर गजविजेता फ्रान्स यंदाही विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे लक्ष लागलंय.

अर्जेंटीनाचा फायनलपर्यंतचा प्रवास

साखळी फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे होते. अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला. या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 ने पराभव सहन करावा लागला. या निकालामुळे मेस्सीचं स्वप्न भंगणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. मात्र त्यानंतर मेस्सीच्या संघानं जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा 2-0 ने पराभव केला. त्यानंतर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात पोलंडला 2-0 मात देत सुपर 16 बाद फेरीत स्थान मिळवलं.

सुपर 16 फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धुळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्या अतितटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी 90 मिनिटं आणि एक्स्ट्रा टाईमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. त्यानंतर निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. हा सामना अर्जेंटिनाने 3-4 ने जिंकला.

फ्रान्सच्या टीमचा आतापर्यंत प्रवास

साखळी फेरीत फ्रान्सनं विजयी सलामी देत ऑस्ट्रेलियाचा 4-1 पराभव केला. त्यानंतर डेन्मार्कला 2-1 ने पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात टुनिसियाकडून 1-0 पराभव सहन करावा लागला. मात्र फ्रान्स बाद फेरीतील सुपर 16 फेरीत स्थान निश्चित केलं होतं. सुपर 16 फेरीत फ्रान्सनं पोलंडचा 3-1 ने धुव्वा उडवला आणि उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत उपांत्य फेरीत धडक मारली. 

डार्क हॉर्स म्हणून चर्चा असलेल्या मोरोक्कोशी उपांत्य फेरीत गाठ पडली. उपांत्य फेीरत फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 ने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. फ्रान्सनं 2018 चा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. वर्ल्डकप 2018 मध्ये सुपर 16 मध्ये फ्रान्सनं अर्जेंटिनाचा 4-3 नं पराभव केला होता.