Dinesh Karthik: वनडे वर्ल्डकपमध्ये अखेर कार्तिकची एन्ट्री; DK ने स्वतः ट्विट करून दिली माहिती

Dinesh Karthik: आयसीसीने देखील टीम घोषित करण्यासाठी 28 सप्टेंबरची डेडलाईन दिली आहे. यावेळी टीम इंडियामध्ये ( Team India ) कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न असतानाच दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) च्या ट्विटमुळे चाहत्यांच्या भुयवा उंचावल्या आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 10, 2023, 04:01 PM IST
Dinesh Karthik: वनडे वर्ल्डकपमध्ये अखेर कार्तिकची एन्ट्री; DK ने स्वतः ट्विट करून दिली माहिती title=

Dinesh Karthik: आयसीसी वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. अशातच आयसीसीने देखील टीम घोषित करण्यासाठी 28 सप्टेंबरची डेडलाईन दिली आहे. यावेळी टीम इंडियामध्ये ( Team India ) कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न असतानाच दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) च्या ट्विटमुळे चाहत्यांच्या भुयवा उंचावल्या आहेत. 

नुकतंच दिनेश कार्तिकने एक ट्विट केलंय. या ट्विटनंतर कार्तिकला वर्ल्डकपसाठी( ICC ODI World Cup 2023 ) टीममध्ये जागा मिळणार असल्याची अटकळ बांधण्यात येतेय. 

काय म्हणाला दिनेश कार्तिक?

दिनेश कार्तिकला एका चाहत्याने सोशल मीडियाच्या ( Social Media ) माध्यमातून एक प्रश्न केला होता. हा प्रश्न असा होता की, आगामी वर्ल्डकमध्ये संजू सॅमसन, ईशान किशन आणि के.एल राहुल यापैकी कोणत्या विकेटकीपरला टीममध्ये जागा दिली गेली पाहिजे. 

चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) म्हणाला की, तुम्हाला मी वर्ल्डकपमध्ये नक्की दिसणार...सध्या तरी मी इतकंच म्हणू शकतं. कदाचित कार्तिक ( Dinesh Karthik ) च्या या म्हणण्याचा अर्थ खेळताना नसून कमेंट्री करताना देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही सिरीजमध्ये चाहत्यांनी कार्तिकला कमेंट्री करताना पाहिलेलं आहे. 

कार्तिक करणार कमेंट्री?

नुकत्याच झालेल्या WTC फायनल आणि ऍशेस 2023 मध्ये दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) ने कमेंट्री केली होती. अशा परिस्थितीत डीके पुन्हा कमेंट्री करणार असल्याची शक्यता आहे. 50 ओव्हर्सच्या सर्वात मोठ्या सामन्यात कमेंट्री करतानाही पाहता येणार आहे. कार्तिकने 2019 वनडे वर्ल्डकप आणि टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाचा भाग होता. 

टीम घोषणेसाठी आयसीसीने दिली डेडलाईन

ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी ( ICC ODI World Cup 2023 ) ऑस्ट्रेलियाने आपली टीम घोषित केलीये. वर्ल्डकप 2023 ( ICC ODI World Cup 2023 ) साठी सर्व 10 देशांना टीमची घोषणा कधीपर्यंत करायची आहे, याबाबत आयसीसीने स्वतः माहिती दिलीये. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, सर्व टीम्सना 28 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकपच्या फायनल स्क्वॉडची घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बीसीसीआय ( BCCI ) आशिया कपनंतर आपल्या टीमची घोषणा करणार असल्याचं म्हटलं जातंय.