Rohit sharma: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये आम्ही काय केलंय हे विसरू...; पराभवानंतर रोहित शर्माचा बहाणा?

Rohit sharma:  दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये भारताचा पहिला डाव 245 रन्स आणि दुसरा डाव 131 रन्सवर आटोपला. यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा एक डाव आणि 32 रन्सने लाजीरवाणा पराभव झाला. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 30, 2023, 09:46 AM IST
Rohit sharma: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये आम्ही काय केलंय हे विसरू...; पराभवानंतर रोहित शर्माचा बहाणा? title=

Rohit sharma: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून पहिल्या टेस्टमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सामन्याच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी टीमला पराभवाची चव चाखावी लागली. या सामन्यात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज आणि गोलंदाज देखील फेल गेलेत.  

दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये भारताचा पहिला डाव 245 रन्स आणि दुसरा डाव 131 रन्सवर आटोपला. यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा एक डाव आणि 32 रन्सने लाजीरवाणा पराभव झाला. परदेशात डावात पराभव पत्करण्याची ही पाच वर्षांतील दुसरी वेळ होती. पहिल्या डावात 67.4 ओव्हर्स आणि दुसऱ्या डावात 34.1 ओव्हर्ससह भारताला या सामन्यात केवळ 101.5 ओव्हर्सत खेळता आले. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 108 ओव्हर्स फलंदाजी केली.

पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

लाजिरवाण्या पराभवावर रोहित शर्मा म्हणाला की, खेळाडूंना प्रेरित करण्याची गरज नाही कारण ते सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. ही कामगिरी केवळ एक आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आम्ही काय केले हे विसरू नका. आम्ही आमच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला. आम्ही आमच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने इंग्लंडमध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले. भारताबाहेर फलंदाजी कशी करायची हेच कळत नाही असं नाहीये.

केएल राहुलच्या फलंदाजीविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की,  प्रत्येक फलंदाजाचे एक वेगळं तंत्र असतं.  दक्षिण आफ्रिकेसारख्या आव्हानात्मक दौऱ्यावर आल्यावर त्यांच्याकडे गेम प्लॅन असणं महत्त्वाचं आहे. पहिल्या डावात केएल राहुलने काय केलंय त्याचा हेतू आणि गेम प्लॅन दिसून येतो. केएल राहुलचं शतक आणि विराट कोहलीचे अर्धशतक वगळता रोहित शर्मासह संपूर्ण टीम अपयशी ठरली.

केएल राहुलची उत्तम फलंदाजी

पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचे टॉप फलंदाज फेल गेले. केवळ के.एल राहुल एकटाच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध लढला. केएल राहुलचे शानदार शतक आणि दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या 76 रन्सशिवाय भारतीय फलंदाज अपयशी ठरले. युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टेस्ट दौऱ्यात प्रभाव पाडू शकले नाहीत.