पाक क्रिकेटपटूंच्या पत्नींकडून हेरगिरी? PCB च्या माजी प्रमुखांचा धक्कादायक दावा

भारत पाकिस्तान मॅच दरम्यान पाक क्रिकेटपटूंच्या पत्नी कोणाची हेरगिरी करायच्या?  

Updated: Apr 16, 2022, 03:59 PM IST
पाक क्रिकेटपटूंच्या पत्नींकडून हेरगिरी? PCB च्या माजी प्रमुखांचा धक्कादायक दावा title=

मुंबई: भारत दौऱ्यादरम्यान हेरगिरीसाठी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूच्या पत्नींना त्यांच्यासोबत पाठवलं जायचं या वक्तव्यानं क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष झाका अश्रफ यांनी धक्कादायक दावा केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

झाका अश्रफ यांच्या दाव्यानुसार  2012 मध्ये पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी हेरगिरीसाठी क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नीलाही पाठवण्यात आलं होतं. यामागचा उद्देश क्रिकेटपटूंवर नजर ठेवणं हा होता असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

झाका अश्रफ यांच्या दाव्यानुसार 2012 च्या भारत पाकिस्तान सीरिज दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंच्या हालचालींवर शंका होती. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाक क्रिकेटर्सच्या महिलांना पाठवण्यात आलं होतं. 

याच कारणासाठी पाकिस्तानच्या क्रिकेटर्ससोबत पत्नीचीही राहण्याची व्यवस्था केली. 2012 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान शेवटची मालिका खेळली गेली. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे क्रिकेटर्स यापूर्वीही पार्टीमध्ये राडा करताना दिसले होते. 

मीडियाच्या हाती याबाबत कोणती माहिती लागली तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डची प्रतिमा मलीन होईल याची भीती झाका यांना होती. त्यामुळे खेळाडूंवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या बायकांना पाठवण्याचा निर्णयही अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. 

हा निर्णय सर्व खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीनं घेतला. भारताचा दौरा करताना पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा झाका यांनी केला.