विराट कोहलीची खिल्ली उडवणं Rohit Sharma च्या चाहत्याला पडलं महागात, गमवावा लागला जीव

या घटनेवरून संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. 

Updated: Oct 15, 2022, 07:40 AM IST
विराट कोहलीची खिल्ली उडवणं Rohit Sharma च्या चाहत्याला पडलं महागात, गमवावा लागला जीव title=

अरियालूर : तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडलं आहे. या घटनेवरून संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. अरियालूर जिल्ह्यात एकाला मित्राची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीये. मुख्य म्हणजे या दोघांमध्ये क्रिकेटवरून वाद झाला, त्यानंतर या व्यक्तीने मित्राला बॅटने वार करत ठार केलं. यामध्ये पी विघ्नेश रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स (MI) चा फॅन होता तक मारणारा एस. धर्मराज हा विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा चाहता असल्याची माहिती आहे.

मंगळवारी 11 ऑक्टोबर रोजी धर्मराज आणि विघ्नेश यांच्यामध्ये ही घटना घडली. हे दोघंही दारू पिऊन क्रिकेटवर गप्पा मारत बसले होते. धर्मराज आणि विघ्नेशला आरसीबी आणि मुंबई यांच्यातील प्रत्येक आयपीएल सामन्यानंतर पार्टी करत असतं. यावेळी पराभूत टीमचा फॅन पार्टीचा खर्च उचलेल.

दरम्यान हे दोघं मंगळवारी दारूची पार्टी करत असताना त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. पोलीसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेशने आरसीबी आणि विराट कोहलीची मस्करी करत खिल्ली उडवली होती. प्राथमिक तपासात विघ्नेशने धर्मराजवरही टीप्पणी केली होती. धर्मराजला बोलताना अडखळत असे, यावरून विघ्नेश त्याची चेष्टा करायचा. त्या दिवशी विघ्नेशने आरसीबीची चेष्टा करत धर्मराजच्या बोलण्यात अडचण असलेवरही कमेंट्सही केल्या.

विघ्नेशच्या अशा वागण्यामुळे संतप्त झालेल्या धर्मराजने त्याच्यावर दारूच्या बाटलीने हल्ला केला आणि क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यात वार करूत त्याला ठार केलं. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विघ्नेशचा मृतदेह निर्जन ठिकाणी कामगारांना आढळून आला. या कामगारांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. 

सध्या धर्मराजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत विघ्नेश हा सिंगापूरला जाण्याचा विचार करत होता आणि त्याचं आयटीआय पूर्ण झालेलं. या घटनेपूर्वी घडली तेव्हा तो व्हिसाची वाट पाहत होता. पोलिसांनी विघ्नेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवलाय.