GT vs SRH : अहमदाबादच्या मैदानावर पॅट कमिन्सचा गेम, साई सुदर्शनची 'इम्पॅक्ट' खेळी

GT vs SRH, IPL 2024 : डेव्हिड मिलरने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी करून गुजरातची नाव विजयाच्या किनाऱ्यावर लगावली. गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.

सौरभ तळेकर | Updated: Mar 31, 2024, 07:14 PM IST
GT vs SRH : अहमदाबादच्या मैदानावर पॅट कमिन्सचा गेम, साई सुदर्शनची 'इम्पॅक्ट' खेळी title=
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad : सनराईजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या 12 व्या सामन्यात गुजरातने हैदराबादचा पराभव करत दुसरा विजय नोंदवला आहे. मोहित शर्माचा (Mohit Sharma) अचूक मारा अन् 3 विकेट्स तसेच साई सुदर्शनच्या (Sai Sudharsan) इम्पॅक्ट खेळीच्या जोरावर गुजरातने चालू हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्यामुळे आता गुजरात टायटन्सचा संघ -0.738 रन रेटसह पाईंट्स टेबलमध्ये (IPL Point table) चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी घसरलाय. 

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादला गुजरात टायटन्सने 162 धावांत रोखलं. गुजरातकडून अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादने सर्वाधिक 29 धावा केल्या. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या एकाही फलंदाजाला 30 धावांच्या पुढे धावा केल्या नाहीत. गुजरातकडून सर्व गोलंदाजांनी चांगला मारा केला. मात्र मोहित शर्माने स्लॉग ओव्हरमध्ये दमदार मारा करत 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान पार करताना वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरूवात करुन दिली. वृद्धीमान बाद झाल्यावर साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला अन् वादळी इनिंग खेळून गेला. साईने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर डेव्हिड मिलरने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी करून गुजरातची नाव विजयाच्या किनाऱ्यावर लगावली. गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल (C), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.