Hardik Pandya: 15 ऑगस्टला हार्दिकने केला तिरंग्याचा अपमान? पंड्याच्या 'त्या' कृत्यावर चाहते नाराज

Hardik Pandya: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. या दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध खेळाडू आणि कलाकार यांनी सोशल मीडियावरून संपूर्ण देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ( Independence Day ) दिल्या. यावेळी टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) चा एक वेगळा आणि हटके अंदाज दिसून आला.

सुरभि जगदीश | Updated: Aug 16, 2023, 04:25 PM IST
Hardik Pandya: 15 ऑगस्टला हार्दिकने केला तिरंग्याचा अपमान? पंड्याच्या 'त्या' कृत्यावर चाहते नाराज title=

Hardik Pandya: भारताताने यंदाचा 15 ऑगस्ट मोठ्या दिमाखात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. या दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध खेळाडू आणि कलाकार यांनी सोशल मीडियावरून संपूर्ण देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ( Independence Day ) दिल्या. अशातच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्याप्रकरणी टीम इंडिया खेळाडू हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) ला प्रचंड ट्रोल केलं जातंय.

स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणी झेंडावंदन करत तर कोणी झेंड्याला सॅल्यूट करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. मात्र यावेळी टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) चा एक वेगळा आणि हटके अंदाज दिसून आला. देशाच्या इतक्या महत्त्वाच्या दिवशी देखील त्याने एड प्रमोशन करत सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. 

हार्दिक पंड्याने जाहिरातीचं प्रमोशन करत दिल्या शुभेच्छा 

टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू ( Hardik Pandya ) हार्दिक पंड्या कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून चर्चेत असतो. यावेळी 15 ऑगस्टच्या निमित्ताने देखील हार्दिक ( Hardik Pandya ) त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

देशाला स्वातंत्र मिळाल्याच्या दिवशी अनेक क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या. यावेळी हार्दिकने एका जाहिरातीच्या प्रमोशनची झलक दाखवली. हार्दिकने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 30 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये इंडियाला तिरंग्याचा रंग देण्यात आलाय. याचसोबत तो boAt. Nirvana ची जाहिरात करताना दिसतोय. 

चाहत्यांनी केलं ट्रोल

दरम्यान हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) च्या या पोस्टवरून चाहत्यांनी त्याला ट्रोल केलंय. स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिकने जाहिरातीचं प्रमोशन करायला नको होतं, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. यावरून चाहत्यांनी त्याला चांगलेच खडे बोल सुनावले असून, काहींनी हार्दिकने तिरंग्याचा अपमान केल्याचं म्हटलंय.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पराभव

वेस्ट इंडिज विरूद्धचा 5 वा सामना दोन्ही टीम्ससाठी करो या मरो परिस्थितीचा होता. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने दिलेल्या 166 रन्सचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली. कायली मेयर्सला बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने उत्तम फलंदाजी केली. किंग आणि निकोलस पूरनने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 61 धावा केल्या. त्यानंतर निकोलस पुरन आणि ब्रँडन किंग यांनी विकेट सांभाळून ठेवत वेस्ट इंडिजचा विजय निश्चित केला.