आयसीसी महिला रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर टॉप १०मध्ये

तडाखेबंद नाबाद दीडशतकी खेळ करत भारतीय संघाला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या हरमनप्रीतने आयसीसी महिला क्रिकेट वनडे रँकिंगमध्ये अव्वल १०मध्ये स्थान मिळवलेय. तर गोलंदाजीत भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने चार स्थानांनी उडी घेतलीये.

Updated: Jul 25, 2017, 08:31 PM IST
आयसीसी महिला रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर टॉप १०मध्ये title=

दुबई : तडाखेबंद नाबाद दीडशतकी खेळ करत भारतीय संघाला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या हरमनप्रीतने आयसीसी महिला क्रिकेट वनडे रँकिंगमध्ये अव्वल १०मध्ये स्थान मिळवलेय. तर गोलंदाजीत भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने चार स्थानांनी उडी घेतलीये.

आयसीसीच्या ताज्या रँकिगनुसार हरमनप्रीतने सात स्थानांनी झेप घेत तिने सहावे स्थान गाठलेय. तर मिताली राज दुसऱ्या स्थानावर आहे. 

कौरशिवाय पूनम राऊतने १४वे स्थान गाठलेय. तर वेदा कृष्णमूर्ती २६व्या स्थानावर पोहोचलीये. गोलंदाजीत झुलन चार स्थानांनी झेप घेत दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये. शिखा पांडे १२व्या स्थानी पोहोचलीये.