हर्मन बवेजा आता असा दिसतो!

बॉलीवूडमधला एके काळचा अभिनेता हर्मन बवेजाचे नवे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. 

Updated: Jun 12, 2017, 07:52 PM IST
हर्मन बवेजा आता असा दिसतो! title=

मुंबई : बॉलीवूडमधला एके काळचा अभिनेता हर्मन बवेजाचे नवे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंकडे बघून तुम्हाला हा खरच हर्मन बवेजा आहे का यावर विश्वासच बसणार नाही.

लव्ह स्टोरी २०५० या चित्रपटातून हर्मननं बॉलीवूडमध्ये आगमन केलं होतं. यानंतर हर्मननं व्हॉट्स युवर राशी आणि व्हिक्ट्री हे चित्रपट केले. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर सपशेल अपयशी ठरल्यानंतर २०१४मध्ये त्यानं पुनरागमन केलं आणि ढिश्क्याव या चित्रपटामध्ये काम केलं पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला आणि त्यानंतर मात्र हर्मन कोणाच्याही नजरेस पडला नव्हता.

आता मात्र हर्मन मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहायला मिळाला. या फोटोमध्ये ३७ वर्षांच्या हर्मन बवेजाचे केस पिकलेले दिसत आहेत. हर्मन हा प्रियांका चोप्राचा एक्स-बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चाही बॉलीवूड वर्तुळात रंगल्या होत्या. लव्ह स्टोरी २०५० आणि व्हॉट्स युवर राशी या चित्रपटांमध्ये प्रियांका आणि हर्मन बवेजा स्क्रिनवर एकत्र दिसले होते. 

 

A post shared by Aditi Mehrotra (@fashion_redefine) on

 

A post shared by MARUF ALI (@sk.marufali) on

 

A post shared by Simar Gill (@simargillz) on