IPL 2022: रिटेन झालेल्या खेळाडूंना किती पैसे मिळणार; पहा संपूर्ण लिस्ट

सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.

Updated: Dec 1, 2021, 08:42 AM IST
IPL 2022: रिटेन झालेल्या खेळाडूंना किती पैसे मिळणार; पहा संपूर्ण लिस्ट  title=

मुंबई : IPL 2022 मेगा ऑक्शनपूर्वी, सर्व 8 संघांनी मंगळवारी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची कायम ठेवण्याची यादी जाहीर केली. पुढील हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कोणकोणत्या खेळाडूंना ठेवायचं आहे याची यादी दिली आहे. यावेळी, राशिद खान, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या सारखी काही नावं होती ज्यांनी त्यांना संघात वगळून सर्वांना आश्चर्यचकित केलं. तर सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.

1. सीएसके

रविंद्र जडेजा (16 करोड रुपये), महेंद्र सिंह धोनी (12 करोड रुपये), मोईन अली (8 करोड रुपये), ऋतुराज गायकवाड (6 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड रुपये, खर्च केले-42 करोड रुपये, आता उरलेले पैसे- 48 करोड रुपये

2. आरसीबी (RCB)

विराट कोहली (15 करोड रुपये), ग्लेन मॅक्सवेल (11 करोड रुपये), मोहम्मद सिराज (7 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड रुपये, खर्च केले- 33 करोड रुपये, आता उरलेले पैसे- 57 करोड रुपये

3. केकेआर (KKR)

आंद्रे रसल (12 करोड रुपये), वरुण चक्रवर्ती (8 करोड रुपये), वेंकटेश अय्यर (8 करोड रुपये), सुनील नरेन (6 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड रुपये, खर्च केले- 34 करोड रुपये, आता उरलेले पैसे- 48 करोड रुपये

4. सनराइजर्स हैदराबाद (SRH)

केन विल्यमसन (14 करोड रुपये), अब्दुल समद (4 करोड रुपये), उमरान मलिक (4 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड रुपये, खर्च केले-22 करोड रुपये, आता उरलेले पैसे- 68 करोड रुपये

5. पंजाब किंग्स (PBKS)

मयंक अग्रवाल (12 करोड रुपये), अर्शदीप सिंह (4 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड रुपये, खर्च केले- 16 करोड रुपये, आता उरलेले पैसे- 72 करोड 

6. दिल्ली कॅपिटल्स (DC)

ऋषभ पंत (16 करोड रुपये), अक्षर पटेल (9 करोड रुपये, नियमांनुसार 12 करोड रूपये मोजावे लागणार), पृथ्वी शॉ (7.5 करोड रुपये), एनरिच नॉर्खिया (6.5 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड रुपये, खर्च केले- 42.50, आता उरलेले पैसे- 47.50 करोड रुपये

7. मुंबई इंडियंस (MI)

रोहित शर्मा (16 करोड रुपये), जसप्रीत बुमराह (12 करोड रुपये), सूर्यकुमार यादव (8 करोड रुपये), कीरोन पोलार्ड (6 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड रुपये, खर्च केले- 42 करोड रुपये, आता उरलेले पैसे- 48 करोड रुपये

8. राजस्थान रॉयल्स (RR)

संजू सॅमसन (14 करोड रुपये), जॉस बटलर (10 करोड रुपये) आणि यशस्वी जायसवाल (4 करोड रुपये)

एकूण पैसे- 90 करोड़ रुपये, उर्वरित पैसे- 28 करोड, आता उरलेले पैसे- 62 करोड