पुढच्या वर्ल्डकपमध्ये मी भारतीय संघात नसेन - मिताली राज

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभूत व्हावं लागल्यानं विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर भारताची कर्णधार मिताली राजने मोठं विधान केलंय.

Updated: Jul 24, 2017, 03:56 PM IST
पुढच्या वर्ल्डकपमध्ये मी भारतीय संघात नसेन - मिताली राज title=

नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभूत व्हावं लागल्यानं विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर भारताची कर्णधार मिताली राजने मोठं विधान केलंय.

भारतीय संघात ती खेळत राहणार आहे मात्र पुढच्या वर्ल्डकपमध्ये मी नसेन असं मितालीने म्हटलंय. सामना संपल्यानंतर झालेल्या सोहळ्यादरम्यान मिताली म्हणाली, मी पुढे काही काळ खेळत राहीन. मात्र पुढच्या वर्ल्डकपमध्ये मी भारतीय संघात नसेन.

३४ वर्षीय मितालीने १९९९मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत १८५ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेय. तसेच तिच्या नेतृत्वाखाली भारताने दोन वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. 
काही दिवसांपूर्वीच तिने वनडेत ६००० हजार धावा पूर्ण केल्या. हा विक्रम करणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरलीये.