आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर, हे दोन भारतीय पहिल्या क्रमांकावर

आयसीसीनं नव्या वनडे क्रमवारीची घोषणा केली आहे.

Updated: Jul 30, 2018, 07:31 PM IST
आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर, हे दोन भारतीय पहिल्या क्रमांकावर  title=

मुंबई : आयसीसीनं नव्या वनडे क्रमवारीची घोषणा केली आहे. या क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर बॉलरच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसीच्या या यादीमध्ये विराटबरोबरच रोहित शर्मा चौथ्या आणि शिखर धवन दहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संथ खेळीमुळे धोनीवर जोरदार टीका झाली होती. या खेळीचा धोनीच्या क्रमवारीवरही परिणाम झाला आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये धोनी १५व्या क्रमांकावर गेला आहे.

बॅट्समनच्या यादीप्रमाणेच बॉलरच्या यादीमध्येही भारताचे ३ खेळाडू टॉप १० मध्ये आहेत. जसप्रीत बुमराह पहिल्या, कुलदीप यादव सहाव्या आणि युझवेंद्र चहल दहाव्या क्रमांकावर आहे. टीमच्या यादीमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.