मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी भारताचा अंतिम संघ जाहीर, अक्षर पटेल बाहेर, 'या' खेळाडूला लॉटरी

ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी संघ फायनल करण्याची आजची शेवटची तारीख होती. 

राजीव कासले | Updated: Sep 28, 2023, 08:21 PM IST
मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी भारताचा अंतिम संघ जाहीर, अक्षर पटेल बाहेर, 'या' खेळाडूला लॉटरी title=

Team India ICC World Cup 2023: भारतात येत्या पाच ऑक्टोबरपासून क्रिकेट कुंभमेळा अर्थात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजेल. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत 10 संघ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दहा संघांनी आपल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. पण संघात बदल करायचा असल्यास 28 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. टीम इंडियाच्या (Team India) संघात मोठा बदल करण्यात आला असून अंतिम खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विश्वचषकासाठीच्या भारतीय क्रिकेट संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. 

भारतीय संघात बदल
विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. आता यात एक बदल करण्यात आला असून अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. ऑलराऊंडर अक्षरपटेल दुखापतग्रस्त असल्याने त्याला संघातून वगळण्यात आलं  आहे. अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला (R Ashwin) संघात स्थान देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्या झालेल्या तीन दिवसांच्या एकदिवसीय मालिकेत आर अश्विनला टीम इंडियात संधी देण्यात आली होती. या मालिकेत अश्विनने दमदार कामगिरी केली. या जोरावरच त्याला विश्वचषक संघाची लॉटरी लागली आहे. 

दोन सराव सामने
विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) रंगणार आहे. त्याआधी टीम इंडियाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. यातला पहिला सराव सामना 30 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी आर अश्विनसह संपूर्ण भारतीय संघ गुवाहाटीत दाखल झाला आहे. भारताचा दुसरा सराव सामना तीन ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध होणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील सर्व दहा संघाचे प्रत्येकी दोन सराव सामने होतील. हे सर्व सराव सामने गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि हैरदराबाद स्टेडिअमवर होतील. 

विश्वचषकसाठी भारताचा अंतिम संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर.

सराव सामन्यात सर्व 15 खेळाडू खेळणार
सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहेत. विशेष म्हणजे सराव सामन्यात सर्व 15 खेळाडूंना खेळण्याची मुबा असणार आहे. 

विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यांचं वेळापत्रक

29 सप्टेंबर 
बांगलादेश Vs श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
दक्षिण आफ्रिका Vs अफगाणीस्तान, तिरुवनंतपुरम, ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम
न्यूजीलँड Vs पाकिस्तान, राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

30 सप्टेंबर 
भारत Vs इंग्लंड, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
ऑस्ट्रेलिया Vs नीदरलँड, तिरुवनंतपुरम, ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम

2ऑक्टोबर
इंग्लंड Vs बांगलादेश, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
न्यूजीलंड Vs दक्षिण अफ्रीका, तिरुवनंतपुरम, ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम

3 ऑक्टोबर
अफगाणीस्तान Vs श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
भारत Vs नीदरलँड, तिरुवनंतपुरम, ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम
पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया, राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद