विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफानलचा सस्पेन्स संपला? पाकिस्तानसमोर आता 'हा' एकच पर्याय

ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं स्थान पक्कं केलंय. आता चौथ्या स्थानचं चित्रही जवळपास स्पष्ट झालंय. 

राजीव कासले | Updated: Nov 9, 2023, 09:00 PM IST
विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफानलचा सस्पेन्स संपला? पाकिस्तानसमोर आता 'हा' एकच पर्याय title=

ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या (World Cup Semifinal) टप्प्यात पोहचलीय. लीगमधले शेवटचे चार सामने बाकी आहेत. पण त्याआधीच सेमीफायनचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या तीन स्थानावर असलेल्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं स्थान निश्चित केलंय आता चौथ्या जागेसाठी न्यूझीलंडचा (New Zealand) संघ जवळपास निश्चित झाला आहे. चौथ्या जागेसाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शर्यत होती. पण न्यूझीलंडने त्यांच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला आणि सेमीफायनलचं तिकिट जवळपास निश्चित केलंय. 

न्यूझीलंडचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय
न्यूझीलंडने गुरुवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेचा एकतर्फी सामन्यात पाच विकेटने पराभव केला. पहिली फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ अवघ्या 171 धावांवर ऑलआऊट झाला. विजयाचं हे सोपं आव्हान न्यूझीलंडने 24 व्या षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. न्यूझीलंडतर्फे डेवॉन कॉन्वे 45, डेरेल मिचेल 43 आणि रचिन रविंद्रने 42 धावा केल्या. 

न्यूझीलंडचं स्थान निश्चित
श्रीलंकेवरच्या विजयाबरोबरच न्यूझीलंडचं सेमीफायनलचं स्थानही जवळपास निश्चित झालं आहे. न्यूझीलंडने नऊ सामन्यात पाच विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात दहा पॉईंट जमा झाले आहेत. तर नेट रनरेटही +0.743 इतका मजबूत झाला आहे. तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या खात्यात 8 सामन्यात 4 विजयांसह 8 पॉईंट जमा आहेत. पण पाकिस्तानचा नेट रनरेट +0.036 इतका आहे. पाकिस्तानचा एक सामना बाकी आहे. येत्या 11 नोव्हेंबरला कोलकाताच्यी ई़डन गार्डन मैदानावर पाकिस्तानचा सामना इंग्लंडशी होईल. या सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडवर केवळ विजय मिळवून चालणार नाही तर नेट रनरेटही वाढवावा लागणार आहे. 

पाकिस्तानसमोर हे आव्हान
पाकिस्ताने पहिली फलंदाजी करत 300 धावा केल्यात तर इंग्लंडला 13 धावांत रोखावं लागेल
पाकिस्ताने पहिली फलंदाजी करत 400 धावा केल्यात तर इंग्लंडला 112 धावांत रोखावं लागेल
पाकिस्ताने पहिली फलंदाजी करत 450 धावा केल्यात तर इंग्लंडला 162 धावांत रोखावं लागेल
पाकिस्ताने पहिली फलंदाजी करत 500 धावा केल्यात तर इंग्लंडला 211 धावांत रोखावं लागेल

अफगाणिस्तानला किती संधी
चौथ्या जागेसाठी अफगाणिस्तानचा संघही शर्यतीत आहे. अफगाणिस्तानने 8 सामन्यात चार विजय मिळवलेत. त्यांचा नेट रनरेट -0.338 इतका आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर अफगाणिस्तानला आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवावं लागणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म बघता हे जवळपास अश्यक आहे. 

भारत-न्यूझीलंड सेमीफायनल
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाच्या सेमीफायनलच्या आशा जवळपास संपुष्टात आल्यात. त्यामुळे पहिल्या स्थानावर असलेल्या भारत आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) सेमीफायनल होणार हे निश्चित झालंय मुंबईच्या वानखेडे मैदानावर येत्या 15 नोव्हेंबरला पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल.