आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप : पृथ्वी शॉने क्वार्टरफायनलआधी संघासाठी केला मोठा त्याग

आयसीसीच्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पृथ्वी शॉने क्वार्टरफायनल सामन्याआधी मोठा त्याग केला. टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉने पहिल्या दोन्ही सामन्यांत सलामीची भूमिका बजावली होती. 

Updated: Jan 19, 2018, 01:48 PM IST
आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप : पृथ्वी शॉने क्वार्टरफायनलआधी संघासाठी केला मोठा त्याग title=

नवी दिल्ली : आयसीसीच्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पृथ्वी शॉने क्वार्टरफायनल सामन्याआधी मोठा त्याग केला. टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉने पहिल्या दोन्ही सामन्यांत सलामीची भूमिका बजावली होती. 

या दोन्ही सामन्यात ओपनिंग करताना शॉने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९४ तर पापुआ न्यू गिनीविरुद्ध नाबाद ५७ धावा केल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने दमदार फलंदाजी केली. यानंतरही तिसऱ्या सामन्यात त्याने बॅटिंग ऑर्डर बदलली. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो सलामीसाठी उतरला नाही. त्याने शुभम गिल आणि हार्विक देसाईंना सलामीची संधी दिली. 

जाणून घ्या याचे कारण

पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने सहज विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनोज कालरा यांनी पहिल्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी केली होती. दोघांनी पहिल्या सामन्यात ३० ओव्हर खेळून काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही शॉ आणि मनोजने ८ ओव्हरमध्ये १० विकेट राखत सामना जिंकला होता. त्यामुळे खालच्या फळीतील फलंदाजांना संधीच मिळाली नाही. 

त्यामुळेच शॉने हा निर्णय घेतला. एखाद्या सामन्यात शॉ लवकर बाद झाल्यास खालच्या फळीतील फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे होते. त्यामुळेच शॉने तिसऱ्या सामन्यात बॅटिंग ऑर्डर बदलली. या सामन्यात त्याने देसाई आणि गिलला संधी दिली. 

या संधीचे या सलामीवीरांनी सोने केले आणि झिम्बाब्वेविरुद्ध १० विकेट राखत विजय मिळवला. झिम्बाब्वेने विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले.