IND vs AUS 3rd ODI: 'या' खेळाडुंना मिळू शकते Playing XI मध्ये संधी

 टीम इंडीया (Team India)ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झालीय.

Updated: Dec 2, 2020, 09:02 AM IST
IND vs AUS 3rd ODI: 'या' खेळाडुंना मिळू शकते Playing XI मध्ये संधी title=

किनारा : पहिल्या दोन मॅच एकतर्फी हरल्यानंतर टीम इंडीया (Team India)ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झालीय. या मॅचमध्ये बॉलिंगमध्ये बदल होणार असल्याचे निश्चित मानलं जातंय. जर ऑस्ट्रेलियाने टीम इंडीयाविरोधात ३-० असा विजय मिळवला तर सलग दुसऱ्या सिरीजमध्ये भारताचा हा पराभव असेल. वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडने देखील टीम इंडीयाला याच फरकाने हरवले होते. 

२० वर्षात पहील्यांदाच ऑस्ट्रेलिया टीमकडून क्लीप स्वीपपासून बचावासाठी काय करायला हवं ? असा प्रश्न टीम इंडीयाच्या (Team India) वरच्या फळीतील बॅट्समन श्रेयश अय्यरला विचारण्यात आला. यावेळी, आम्ही मॅच जिंकणार आहोत आणि स्पीप होऊ नये यासाठी प्रयत्न करु असे तो म्हणाला.

आमचे बॉलर्स त्यांच्या बॉलिंगप्रती सकारात्मक आहेत आणि आम्ही सरावादरम्यान हे पाहतोय. काही बॉलर्स रणनितीवर काम करतायत असेही श्रेयश म्हणाला. 

कोहली आणि लोकेश राहुल दुसऱ्या मॅचमध्ये चांगल्या लयीत दिसले. राहुल दुसऱ्या पॉवर प्ले दरम्यान स्ट्राइक रोटेड करण्यात अपयशी ठरला हा चिंतेचा विषय आहे. भारतीय बॅट्समन दोन्ही मॅचमध्ये बरा परफॉर्मन्स करतायत. जर बॉलर्सचा परफॉर्मन्स थोडा चांगला असता तर टीम इंडीयाला विजयाची चांगली संधी होती. 

भारताची संभाव्य प्लेइंग XI: मयांक अग्रवाल, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, नवदीप सैनी/ शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/टी नटराजन, युजवेंद्र चहल/कुलदीप यादव.

भारताची पूर्ण टीम: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, शुभमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि टी नटराजन.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग XI: एरोन फिंच (कप्तान), डार्सी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कॅरी, मोइजेस हेनरिक्स,एडम जम्पा, जोश हेजलवुड, सीन एबट, मिशेल स्टार्क.

ऑस्ट्रेलियाची पूर्ण टीम : एरोन फिंच (कॅप्टन), डार्सी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कैरी, मिशेल स्टार्क, एडम जम्पा, जोश हेजलवुड, सीन एबट, एश्टन एगर, कॅमरून ग्रीन, मोइजेस हेनरिक्स, एंड्रयू टाय, डेनियल सॅम्स और मॅथ्यू वेड.