Ind vs Eng: आजपासून तिसरा कसोटी डे-नाइट सामना, टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचं आव्हान

 भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळवला जात आहे.

Updated: Feb 24, 2021, 08:32 AM IST
Ind vs Eng: आजपासून तिसरा कसोटी डे-नाइट सामना, टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचं आव्हान title=

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळवला जात आहे. तिसरा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना डे-नाइट असणार आहे. जगातील सर्वात मोठ्या मेटेरा स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय संघानं इंग्लंडवर दुसरा कसोटी सामना जिंकून 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामने जिंकणं भारतासमोर आव्हान असणार आहे. 

पुढील दोन कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यास टीम इंडियाच्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीपर्यंत जाण्याचा मार्ग कठीण होऊ शकतो. मोटेराचे स्टेडियम नव्या पद्धतीने तयार झाले असून येथील खेळपट्टी भारतीय संघासाठी पूर्णपणे नवीन आहे. त्यामुळे यावर फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना नेमकं काय घडू शकतं याचं भाकीत करणं थो़डं अवघडच असणार आहे. पण भारतीय संघाला इंग्लंडला पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे. 

हा सामना गुलाबी चेंडूनं खेळवला जाणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने गुलाबी बॉलने केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे हे दोन कसोटी सामने भारतीय संघाला गमवणं पत्करणारं नाही. 

तिसर्‍या कसोटी सामन्यात भारत संघात तीन स्पिनरला खेळण्याचे धोरण बदलू शकते. चेन्नईत पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने तीन स्पिनरना संधी दिली होती. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या डे-नाईट टेस्टमध्ये वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डे-नाईट टेस्टमध्ये रवींद्र जडेजाने दोन तर रविचंद्रन अश्विनने अवघ्या 5 ओव्हर गोलंदाजी केली.

भारतीय संघात कोण कोण असू शकतं? 
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकिपर), ऋद्धिमान साहा (विकेटकिपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

इंग्लंड संघात कोण असू शकतं?
जो रूट (कर्णधार), जेम्स अॅण्डरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टॉ, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॅक क्रॉउली, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वुड.

भारतीय संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून देण्यासाठी मोटेरा स्टेडियमची खेळपट्टी भारतीय संघातील खेऴाडूंना साथ देईल अशी आशा आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही एक दिलासा देणारी बाब आहे. भारतीय संघात प्लेइंग इलेव्हनमधून कुलदीप यादवला बाहेर करण्यात येऊ शकतं. तर जो रुट, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टोसारख्या खेळाडूंना धूळ चारण्यासाठी आणि इंग्लंडचा डाव हाणून पाडण्यासाठी उमेश यादव आणि ईशांतला संघात संधी मिळू शकते.