कौतुकास्पद! रोहित आणि अक्षर पेटलची ICC TEST RANKINGमध्ये यशस्वी झेप

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत आर अश्विने 7 विकेट्स घेऊन करिअरमध्ये 400 विकेट घेण्याचा एक नवीन रेकॉर्ड केला.     

Updated: Feb 28, 2021, 09:18 PM IST
कौतुकास्पद! रोहित आणि अक्षर पेटलची ICC TEST RANKINGमध्ये यशस्वी झेप title=

मुंबई- इंग्लंड विरुद्ध मध्ये सुरु आसलेल्या चार कसोटीच्या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना बाकी आहे. भारतीय संघाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जगातील बेस्ट गोलंदाजच्या यादी मध्ये 4 पटीनं झेप घेतली. तर दुसरीकडे रोहित शर्माने टेस्टच्या करिअर मध्ये सर्वोत्कृष्ट कमगिरी करत स्थान प्राप्त करुन घेतले. 

तीन टेस्ट मॅचमध्ये आर अश्विने 24 विकेट बाद करत मालिकेत सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रुट नंतर मालिकेतील, भारतीय संघात फलंदाजी करणारा रोहित शर्मा हा सर्वात बेस्ट स्कोरर पदवी मिळाली आहे. तर रोहितने दोन सामन्यांमधील 6 डावांत 296 धावा केल्या आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत आर अश्विने 7 विकेट्स घेऊन करिअरमध्ये 400 विकेट घेण्याचा एक नवीन रेकॉर्ड केला. आर. अश्विनने तिसऱ्या कसोटीत 7 विकेट बाद करुन जगातील गोलंदाज यादीत तृतीय गोलंदाजचे स्थान मिळवलं. दुसरीकडे रोहित शर्मा जगातील यादीत आठवा फलंदाज ठरलेला असून, भारतीय संघात विराट आणि पुजारा नंतर तृतीय क्रमांकावर फलंदाजांमध्ये स्थान प्राप्त केलं.

जगातील फलंदाजांच्या यादीत न्यूझिलंडचा कर्णधार केन विलियमकन प्रथम क्रमांकाच्या स्थानवर यशस्वी ठरलेला आहे. तर ऑस्टेलियामधील गोलंदाज कमिन्स याला देखील प्रथम क्रमांकावर अद्याप कायम आहे. दुसरीकडे भारतीय संघातील गोलंदाज लेफ्टआर्म स्पिनर अक्षर पटेल एक उंच उड्डी घेत जगातील गोलंदाज यादीमध्ये 38 क्रमांकावर नाव पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.