IND vs ENG 3rd TEST : काळजावर दगड ठेऊन रोहित शर्मा घेणार 'हा' मोठा निर्णय, कुलदीप यादवने सांगितलं कारण!

IND vs ENG, Kuldeep Yadav : विराट आणि राहुल बाहेर असल्याने युवा फलंदाजांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. अशातच आता टीम इंडियाचा चायना मॅन गोलंदाज कुलदीप यादव याने मोठी अपडेट दिली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Feb 13, 2024, 06:34 PM IST
IND vs ENG 3rd TEST : काळजावर दगड ठेऊन रोहित शर्मा घेणार 'हा' मोठा निर्णय, कुलदीप यादवने सांगितलं कारण! title=
IND vs ENG, Kuldeep Yadav

India vs England 3rd Test : येत्या 15 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG 3rd TEST) खेळवला जाणार आहे. मालिका आता 1-1 ने बरोबरीत असल्याने तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्याची संधी रोहित शर्मा (Rohit Sharma) अँड कंपनीकडे आहे. अशातच आता तिसरी कसोटी टीम इंडियासाठी सोपी असणार नाही. विराट आणि राहुल बाहेर असल्याने युवा फलंदाजांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. अशातच आता टीम इंडियाचा चायना मॅन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने मोठी अपडेट दिली आहे.

काय म्हणाला कुलदीप यादव?

मला वाटतंय की रविंद्र जडेजा उद्या खेळेल. त्याने नेहमीप्रमाणे दिनक्रम आणि सराव पूर्ण केला. काल त्याने सराव सत्रात भाग घेतला होता. त्यामुळे तो उपलब्ध असेल, असं वक्तव्य कुलदीप यादवने म्हटलं आहे. त्याचबरोबर खेळपट्टी फिरकीपटूंना मदत होईल, अशी खेळपट्टी असू शकते, अशी शक्यता देखील कुलदीप यादवने वर्तविली आहे. 

जर तिसऱ्या सामन्यासाठी खेळपट्टी ही फिरकीपटूंना फायद्याची ठरणार असेल तर रोहित शर्मा मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. टीम इंडियामध्ये सध्या आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव असे पाच फिरकीपटू आहेत. त्यामुळे आता रोहित शर्मा तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जातोय. त्यामुळे आता काळजावर दगड ठेऊन रोहित शर्मा फक्त एका फास्टर गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार? असा सवाल जेव्हा कुलदीपला विचारला गेला तेव्हा, 'मला माहित नाही की आमचा दृष्टिकोन किंवा विचार काय असेल. वास्तविक हा टीम मॅनेजमेंटचा निर्णय आहे. नक्कीच तुम्हा सर्वांना उत्तम क्रिकेट खेळताना बघायचं आहे. चांगल्या क्रिकेटसाठी चांगल्या विकेट्स असणं महत्त्वाचं आहे', असंही कुलदीप म्हणतो.

तिसऱ्या सामन्यासाठी कशी खेळपट्टी अपेक्षित आहे, असा सवाल कुलदीप यादवला विचारला गेला. तेव्हा त्याने थेट उत्तर दिलं. मला याबद्दल माहिती नाही. फिरकीला गोलंदाजांना मदत मिळेल, अशी शक्यता आहे. जेव्हा जेव्हा मला खेळण्याची संधी मिळते तेव्हा मी त्याचा पुरेपूर आनंद घेतो, मग विकेट सपाट असो किंवा टर्निंग असो. आमच्यासाठी केवळ फिरकी गोलंदाजीच नाही तर फलंदाजीही महत्त्वाची आहे, असं कुलदीप यादव म्हणाला आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

भारत Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक -

तिसरी कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची 
पाचवी कसोटी सामना : 7-11 मार्च, धर्मशाला.