Ind vs Eng: या भारतीय गोलंदाजाकडे 71 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

इंग्लंड विरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार रविचंद्रन अश्विन दोन मोठे विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 3, 2021, 04:15 PM IST
 Ind vs Eng: या भारतीय गोलंदाजाकडे 71 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी title=

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा चौथा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होत आहे. या अंतिम सामन्यात 71 वर्षांपूर्वीच्या वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याची संधी एका गोलंदाजाकडे आहे. कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा खेळाडू करू शकतो. या खेळाडूला इंग्लंडला माघारी धाडून आणखीन एक विक्रम आपल्या नावावर करून घेण्यासाठी ही संधी मोलाची ठरू शकणार आहे. 

इंग्लंड विरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार रविचंद्रन अश्विन दोन मोठे विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्याने 77 कसोटी सामन्यात 401 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली तर भारतीय संघ ही मालिका 3-1ने जिंकू शकते. इतकच नाही तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याला उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळू शकते. 

चौथ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन (आर. अश्विन) 10 विकेट घेतल्यास इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होईल. अश्विनने आतापर्यंत या मालिकेत 24 विकेट्स घेतल्या आहेत आणि 10 गडी राखून त्यांचा आकडा 34 पर्यंत पोहचू शकेल. वेस्ट इंडीजचा माजी गोलंदाज अल्फ्रेड व्हॅलेंटाईनचा 71 वर्षांचा विश्वविक्रम आर अश्विन मोडण्याची शक्यता आहे. 

1950 मध्ये अल्फ्रेड व्हॅलेंटाईनचा विक्रम

इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्टइंडिजचे पूर्व गोलंदाज अल्फ्रेड व्हॅलेंटाइन यांनी केला होता. त्यांनी 1950मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 33 विकेट्स घेतल्या होत्या. आता भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात आर अश्विनला हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत 24 विकेट्स घेतल्या आहेत. आणखीन 10 विकेट्स घेतल्या तर तो हा विक्रम मोडू शकतो. 

अश्विनने आतापर्यंत एकूण 603 विकेट्स घेतल्या आहेत. 401 कसोटी सामन्यांमध्ये 150 वन डे सामन्यांमध्ये तर 52 टी-20 सामन्यांमध्ये विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे अनिल कुंबळे (956) आहेत. तर दुसऱ्या स्थानावर 711 विकेट्स घेणारे हरभजन सिंह आहेत. तिसऱ्या स्थानावर कपिल देव 687 स्थानावर आहेत.