एक चूक अन् होऊ शकतो खेळ खल्लास, पण 4 धुरंधर फलंदाज सांभाळू शकतात टीम इंडियाची कमान

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडनं 2-1ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकण्याचं भारतीय संघापुढे मोठं आव्हान आहे. भारतीय संघाला केवळ दुसरा सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. 

Updated: Mar 18, 2021, 04:01 PM IST
एक चूक अन् होऊ शकतो खेळ खल्लास, पण 4 धुरंधर फलंदाज सांभाळू शकतात टीम इंडियाची कमान title=

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडनं 2-1ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकण्याचं भारतीय संघापुढे मोठं आव्हान आहे. भारतीय संघाला केवळ दुसरा सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. 

चौथा सामना जर भारतीय संघ जिंकला नाही तर मालिकेत आपला पराभव होऊ शकतो. भारतीय संघाला एक छोटी चूकही महागात पडण्याची शक्यता आहे. 4 धुरंधर फलंदाजांवर टीम इंडियाची कमान असणार आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. 

1. विराट कोहली
तिसऱ्या टी 20 सामन्यात कोहलीनं नाबाद 77 धावा केल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात 73 धावा करण्यात यश आलं. चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या खांद्यावर मोठी कमान असणार आहे. सामना जिंकण्यासाठी आता विराटला पुन्हा फॉर्ममध्ये यावं लागणार आहे. 
2. रोहित शर्मा
रोहित शर्मानं कसोटी सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती. पहिल्या दोन कसोटी सामन्यात रोहितला संधी देण्यात आली नव्हती. चौथ्या सामन्यासाठी आता रोहितची बॅट तुफान चालली तर फायदा थेट टीम इंडियाला मिळणार आहे.
3. ऋषभ पंत
ऋषभ पंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पंतने पहिल्या टी -20 सामन्यात 21 तर दुसर्‍या टी -20 सामन्यात 26 धावा केल्या. तिसर्‍या टी -२० सामन्यात पंतकडून मोठा डाव अपेक्षित होता, परंतु कर्णधार विराट कोहलीच्या चुकीच्या आवाहनामुळे तो रनआऊट झाला. चौथ्या टी 20 सामन्यात त्याला पुन्हा एकदा आपली दमदार खेळी करण्याची संधी मिळणार आहे. 
4. ईशान किशन
दुसऱ्या टी 20 सामन्यात डेब्यु करणाऱ्या ईशाननं 56 धावांची खेळी केली. 35 चेंडूमध्ये त्यानं 5 चौकार आणि 4 षटकारही लगावले आहेत. तिसऱ्या 
टी 20मध्ये केवळ 4 धावा काढण्यात यश आलं. आता चौथ्या टी 20 सामन्यात पुन्हा एकदा ईशानंची बॅट तुफान फिरली तर भारतीय संघाचा विजयाचा मार्ग निश्चित होऊ शकतो.