IND vs ENG: Jasprit Bumrah शी इंग्लंडचे खेळाडू भिडताच, Virat Kohli चा ताबा सुटला आणि...

बुमराहशी अशी झाली इंग्लंडच्या खेळाडूंची टक्कर ....   

Updated: Aug 16, 2021, 09:19 PM IST
IND vs ENG: Jasprit Bumrah शी इंग्लंडचे खेळाडू भिडताच, Virat Kohli चा ताबा सुटला आणि...  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या क्रिकेट संघाविरोधात 5 दिवसांच्या कसोटी मालिकेतीस दुसरा सामना खेळत आहे. या सामन्याच्या चौथ्याच दिवशी दोन्ही खेळाडूंमध्ये वातावरण काहीसं तापल्याचं दिसून आलं. पाचव्या दिवशीही यात फारसा बदल झालेला दिसला नाही. जसप्रीत बुमराह फलंदाजीसाठी आला असता याचाच प्रत्यय आला. 

बुमराहशी इंग्लंडच्या खेळाडूंची टक्कर (IND vs ENG) .... 
लॉर्ड्स टेस्ट (Lords Test) च्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि काही षटकांचा खेळ झाल्यानंतरच ऋषभ पंत तंबूत परतला. तो बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराह फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. ज्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ दाखवण्यास सुरुवात केली. 

अनेकदा इंग्लंडचे खेळाडू आणि बुमराह आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. याच क्षणंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं इंग्लंडचा यष्टीरक्षक अर्थात विकेटकीपर जोस बटलर बुमराहला काही बोलताना दिसत आहे. 

तिथं कोहलीचा संपातही आवरेना.... 
बुमराह (Jasprit Bumrah) आणि इंग्लंडचा खेळाडू एमेकांसमोर ठाकले तेव्हा भारताचे खेळाडू लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये हसले होते. इंग्लंडच्या खेळाडूंची ही वर्तणूक भारतीय खेळाडूंना अजिबातच पटली नाही. ज्यानंतर राग अनावर झाला आणि विराट कोहलीनं (virat-kohli) विरोधी संघाला सुनावलं. सोशल मीडियावर या साऱ्याचा एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. 

सूडाची भावना इथेही.... 
इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी बुमराहनं त्याला वारंवार बाऊंसर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाच सूड म्हणून, तो फलंदाजीसाठी आला तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याच्यावर गोलंदाजीचा मारा सुरु केला.