IND vs ENG: विराट कोहलीच्या नावावर आणखी एक लाजीरवाणा रेकॉर्ड

 विराट कोहलीच्या नावावर शून्यवर आऊट होण्याचा एक लाजीरवाणा विक्रम असतानाच आता आणखी एक विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. 

Updated: Mar 18, 2021, 09:40 AM IST
IND vs ENG: विराट कोहलीच्या नावावर आणखी एक लाजीरवाणा रेकॉर्ड title=

अहमदाबाद: विराट कोहलीच्या नावावर शून्यवर आऊट होण्याचा एक लाजीरवाणा विक्रम असतानाच आता आणखी एक विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देणारा आहे. त्यामुळे त्याला जगातला सर्वोत्कृष्ट फिल्डर असल्याचंही काही तज्ज्ञांचं मत आहे. अवघड कॅच पकडणं, धावा काढण्यात विराट कोहली सर्वात पुढे असतो. मात्र या गोष्टी असल्या तरी लाजीरवाणा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

याआधी शून्यवर आऊट होण्याचा विक्रम तर त्याच्या नावावर होताच पण कॅच सोडण्याचा विक्रमही त्याने केला आहे. इंग्लंडविरुद्ध मंगळवारीखेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी -20 सामन्यात विराट कोहलीच्या नावावर अतिशय लाजीरवाणी विक्रम आहे. या सामन्याच्या 15 व्या ओवरमध्ये विराट कोहलीने इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरलाने टोलवलेला साधा बॉल कॅच केला नाही. हा कॅच विराटच्या हातून सुटला.

कोहलीनं सोडले 6 कॅच
विराट कोहलीनं 2019 पासून ते टी 20 सामन्यापर्यंत सर्वाधिक कॅच सोडले आहेत. आतापर्यंत त्याने 6 कॅच सोडले आहेत. त्यामुळे हा लाजीरवाणा विक्रम
टी 20 इंटरनॅशनल सामन्यात सर्वाधिक कॅच सोडणारा खेळाडूंच्या यादीत विराटचं नाव
विराट कोहली- 6 कॅच सोडले
क्रिस जॉर्डन- 5 कॅच सोडले
स्टीव स्मिथ- 4 कॅच सोडले
युजवेंद्र चहल- 4 कॅच सोडले