कोहली झाला स्पॅयडरमॅन! हवेत असा पकडला कॅच की फोटो पाहून व्हाल थक्क

कोहलीनं असा जबरदस्त कॅच घेतला की...चर्चा तर होणारच! 

Updated: Mar 29, 2021, 08:08 AM IST
कोहली झाला स्पॅयडरमॅन! हवेत असा पकडला कॅच की फोटो पाहून व्हाल थक्क title=

मुंबई: इंग्लंड विरुद्ध 3 वन डे सामन्यांच्या मालिकेवर भारतीय संघानं विजय मिळवला आहे. तिसरा वन डे सामना खूप जास्त रंजक झाला. अतितटीच्या खेळात भारतीय संघ 7 धावांनी जिंकला आहे. वन डे सीरिज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाचं कौतुक होत आहे. कारण भारतीय संघानं तिन्ही फॉरमॅटमध्ये विजय मिळवला आहे.

तिसऱ्या वन डे सामन्यादरम्यान फील्डिंग करताना कर्णधार विराट कोहलीनं जबरदस्त कॅच पकडला आहे. विशेष म्हणजे हा कॅच डाव्या हाताने हवेत उडी मारून पकडला. कॅच पकडत असताना विराटच्या हातालाही दुखापत झाली. आदिलनं टोलवलेला चेंडू पकडताना विराट कोहलीनं हवेत झेप घेतली. त्यावेळी तो स्पायडरमॅन सारखा हवेत उडी घेऊन कॅच पकडताना दिसला आहे. 

तिसऱ्या वन डे सामन्यात बेस्ट कॅच असून बीसीसीआयनं स्वत: फोटो शेअर केले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर विजयासाठी स्वत:ला जळावं लागतं असं नेटकऱ्यांनी म्हणत विराट कोहलीचे फोटो ट्वीट केले आहेत. इतकच नाही तर त्यावर अनेक उत्तम मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हा कॅच पकडताना विराट कोहलीच्या हाताला दुखापत देखील झाली आहे. अनेकांनी विराट आणि झेप घेणाऱ्या वाघाचं चित्र लावून त्याचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिन फॉरमॅट म्हणजे कसोटी, टी 20 आणि वन डेचा विचार करायचा झाला तर विराट कोहलीचा हा कॅच सर्वात बेस्ट होता. या कॅचची जरा तर जगभरात सुरू आहे.