भारत वि. न्यूझीलंड: कुलदीप यादवचा जबरदस्त कॅच

भारत आणि न्यूझीलंड पहिल्या वनडेत कुलदीपचा जबरदस्त कॅच

Updated: Jan 23, 2019, 11:06 AM IST
भारत वि. न्यूझीलंड: कुलदीप यादवचा जबरदस्त कॅच title=

नॅपियर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांच्या सीरीजला आजपासून सुरुवात झाली आहे. नॅपियरमध्ये आज पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत आता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत न्यूझीलंडच्या संघाला 157 रनवर ऑलआऊट केलं. या सामन्यात कुलदीप यादवने एक असा कॅच पकडला की हा कॅच पाहून अनेक जण हैराण झाले.

कुलदीपने पकडला निकोलसचा शानदार कॅच

न्यूझीलंडच्या इनिंगच्या 24 व्या ओव्हरमध्ये आणि केदार जाधवच्या बॉलिंगवर सहाव्या बॉलमध्ये न्यूझीलंडच्या हेनरी निकोलस कुलदीप यादवने जबरदस्त कॅच पकडला.

हेनरी निकोलसने मिडविकेटच्या दिशेने शॉट मारला. पण या ठिकाणी फिल्डिंग करत असलेल्या कुलदीप यादवने शानदार डाईव करत हा कॅच पकडला. निकोलसला 12 रनवर कुलदीपने माघारी पाठवलं.

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. 32 ओव्हरमध्ये त्यांनी 6 विकेट गमवत फक्त 140 रन केले होते. त्यानंतर न्यूझीलंडची टीम 38 ओव्हरमध्ये 157 रनवर ऑलआऊट झाली.