Ind vs Nz : वाढदिवशीच रचला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, भारता विरुद्ध 'हा' विक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

बर्थ डे बॉयची कमाल...Ind vs Nz सामन्यात रचला अनोखा विश्व विक्रम

Updated: Oct 31, 2021, 10:57 PM IST
Ind vs Nz : वाढदिवशीच रचला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, भारता विरुद्ध 'हा' विक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज title=

दुबई: भारत विरुद्ध किवी सामना आज दुबईमध्ये झाला. पाकिस्तान पाठोपाठ टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाचा पुन्हा एकदा सामना करावा लागला. किवी संघाने 8 विकेट्स राखून टीम इंडियाचा पराभव केला आहे. टीम इंडियासाठी आता सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता धूसर होत आहे. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 111 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडनं एक विकेट गमावत हे आव्हान सहज पार केलं. 

या सामन्यात आणखी घटना घडली. बर्थ डे बॉय असलेल्या खेळाडूनं अनोखा रेकॉर्ड केला आहे. या विक्रमामुळे त्याची जगभरात चर्चा आहे. सौढी (Ish Sodhi) स्ट्रिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किवी टीममधील ईश सौढीने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. भारता विरुद्ध हा विक्रम करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. 

ईश सोढीने (Ish Sodhi) भारता विरुद्ध 4 ओवरमध्ये 17 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेऊन त्याने टीम इंडियाच्या चाहत्यांना नाराज केलं. या दोन्ही धडाकेबाज फलंदाजांची विकेट घेत त्याने किवीला फायदा मिळवून दिला. 

Ish Sodhi चा रेकॉर्ड

Ish Sodhi ने भारता विरुद्ध आपल्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली. विराटला आऊट करत त्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. T20 मध्ये विराट कोहलीला 3 वेळा बाद करणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. या गोलंदाजा विरुद्ध विराट कोहलीने 7 डावात केवळ 42 धावा केल्या आहेत. 

Ish Sodhi ने 17 कसोटी सामने खेळून 41 विकेट्स घेतल्या आहेत. तर 33 वन डे सामने खेळून 43 धावा घेतल्या आहेत. टी 20 फॉरमॅटमध्ये तो 58 सामने खेळला आहे. या सामन्यात 75 विकेट्स घेतल्या आहेत. ईश हा भारतीय वंशाचा खेळाडू असल्याचंही सांगितलं जातं. त्याचा जन्म 31 ऑक्टोबर रोजी लुधियाना येथे झाला.