IND vs SL 3rd T20 :तिसऱ्या टी20 सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज, जाणून घ्या

IND vs SL 3rd T20 Pitch,Weather Report: तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत आणि श्रीलंकेने (India vs sri lanka) 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या सामन्यावर बाजी मारून कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहावे लागणार आहे.   

Updated: Jan 7, 2023, 03:37 PM IST
IND vs SL 3rd T20 :तिसऱ्या टी20 सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज, जाणून घ्या title=

IND vs SL 3rd T20 Pitch,Weather Report: टीम इंडिया आणि श्रीलंकेत (India vs sri lanka) आज सायंकाळी तीसरा टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (saurashtra cricket association stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील राजकोटच्या मैदानाचा पिच रिपोर्ट (Pitch report) काय आहे? तसेच हवामानाचा अंदाज काय आहे, हे जाणून घेऊयात. दरम्यान आतापर्यंत या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरा टी 20 सामना कोण जिंकतो? याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा :  श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा तापाने फणफणला! पुण्यातील डॉक्टरांकडून यशस्वी उपचार

असे रंगले सामने 

हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya)नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिला टी20 सामना 2 धावांच्या फरकाने जिंकला होता.त्यानंतर दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने दुसऱ्या टी20 सामन्यात जोरदार पुनरागमन करत 16 धावांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 206 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला 8 विकेट्सवर 190 धावाच करता आल्या. त्यामुळे दुसरा टी20 सामना श्रीलंकेने 16 धावांनी जिंकला.आता तिसऱ्या सामन्यावर कोण बाजी मारते, हे पाहावे लागणार आहे.

पिच रिपोर्ट काय सांगतो? 

राजकोटची खेळपट्टी कोणत्या संघाला मदतगार ठरणार आहे, हे जाणून घेऊयात. राजकोटच्या खेळपट्टीला हायवे असेही म्हणतात. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी  (saurashtra cricket association stadium)फलंदाजांसाठी उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला येथे मोठी धावसंख्या उभारता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना येथे मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळणार आहे. 
 
या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी 175 धावांची आहे. फिरकीपटूही येथे आपली जादू दाखवू शकतात कारण चेंडू संथ असेल तर तो बॅटवर सहजासहजी येत नाही. पण सपाट खेळपट्टी आणि दोन्ही संघांचे खेळाडू पाहता येथे मोठी धावसंख्या पाहायला मिळेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हवामानाचा अंदाज काय? 

राजकोटचे (saurashtra cricket association stadium) हवामान अगदी स्वच्छ असणार आहे. येथे संध्याकाळी तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे, जेणेकरून खेळाडूंना सामना खेळताना कोणतीही अडचण येणार नाही. येथे आर्द्रता 42 टक्के राहील, तर वारा 13 किमी प्रतितास वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. राजकोटमध्ये पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने चाहत्यांना सामन्याचा संपूर्ण उत्साह पाहायला मिळणार आहे.

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत आणि श्रीलंकेने (India vs sri lanka) 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या सामन्यावर बाजी मारून कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहावे लागणार आहे.