IND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात

India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.

सौरभ तळेकर | Updated: Nov 26, 2023, 10:57 PM IST
IND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात title=
IND vs AUS 2nd T20I

IND vs AUS 2nd T20I : तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा 44 धावांनी पराभव (India beat Australia) केला आहे. टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी मिळवली आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला आहे. भारताकडून ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन यांनी अर्धशतकीय खेळी केली.

टीम इंडियाने दिलेल्या 236 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने बिग बॉशची शैली दाखवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एकामागून एक विकेट्स गेल्या. जॉश इंग्लिश आणि मॅथ्यू शॉर्ट यांना रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवल्यानंतर अक्षर पटेलने मॅक्सवेलचा काटा काढला. त्यानंतर टीम इंडियाचं गणित सोपं झालं. प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार यांनी प्रेशर देत एकामागून एक विकेट्स खोलल्या. प्रसिद्ध कृष्णाची 16 वी ओव्हर गेम चेंजर ठरली. या ओव्हरमध्ये 2 विकेट्स गेल्या अन् सामना भारताच्या हातात आला. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने 3-3 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप, मुकेश आणि अक्षरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने विशालकाय लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच टीम इंडियाने 230 हून अधिकचं आव्हान दिलं होतं. सपाट पीच असल्याने फलंदाजांची चांदी झाली होती. एकीकडे ऋतुराज आणि दुसरीकडं यशस्वी जयस्वाल.. दोघांनी सपाटा चालू केला. 6 ओव्हरमध्ये 77 धावांची भागेदारी दोघांनी केली. यशस्वी 53 धावा करून बाद झाल्यानंतर इशान किशनने आक्रमक खेळी सुरू ठेवली. कॅप्टन सुर्यकुमार बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिंकू सिंग याने 9 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्स खेचत 31 धावांचं बहुमुल्य योगदान दिलं. तर तिलकने खणखणीत सिक्स मारत टीम इंडियाला 235 वर पोहोचवलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने 3 विकेट्स घेतल्या.

भारत (प्लेइंग इलेव्हन) 

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (w), सूर्यकुमार यादव (C), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन)

स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (w/c), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, तन्वीर संघा.