लंकेला टी-20 मध्येही लोळवण्यासाठी भारत सज्ज

तीन टेस्ट आणि पाच वनडेमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश केल्यानंतर आता एकमेव टी-20 मध्येही लंकेला लोळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 

Updated: Sep 5, 2017, 11:02 PM IST
लंकेला टी-20 मध्येही लोळवण्यासाठी भारत सज्ज  title=

कोलंबो : तीन टेस्ट आणि पाच वनडेमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश केल्यानंतर आता एकमेव टी-20 मध्येही लंकेला लोळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. उद्या संध्याकाळी ७ वाजता कोलंबोमध्ये ही मॅच खेळवली जाणार आहे.

आई आजारी असल्यामुळे भारताचा ओपनर शिखर धवन हा भारतामध्ये परत आला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेला संधी मिळते का कोहली स्वत: ओपनिंगला येतो हे पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि अक्सर पटेल यांना या मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल.राहुल, मनिष पांडे, एम.एस.धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, युझुवेंद्र चहाल, जसप्रीत बुमराह