भारत मजबूत स्थितीत, आश्विन ठरणार 'ट्रम्प कार्ड' ?

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव थोडक्यात आटोपण्यात आश्विनची भूमिका महत्त्वाची

Updated: Dec 9, 2018, 09:07 AM IST
भारत मजबूत स्थितीत, आश्विन ठरणार 'ट्रम्प कार्ड' ? title=

एडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतानं सामन्यावर मजबूत पकड केलीय. तिसऱ्या दिवसाच्या ३ बाद १५१ धावांच्या पुढे खेळताना भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं अर्धशतक झळकावलं. पुजारा आणि रहाणेनं पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत दोन्ही फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. भारतानं तीनशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

बुमराहला विश्वास 

या टेस्टच्या चौथ्या डावात ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विन ट्रम्प कार्ड ठरेल असं मत भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने व्यक्त केलंय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव थोडक्यात आटोपण्यात आश्विनची भूमिका महत्त्वाची होती. त्याने भारतातर्फे सर्वाधिक 3 विकेट घेतले.

'ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नाखन लॉयन देखील टेस्टमध्ये चांगल प्रदर्शन करतोय. नाथन लॉयल पिचचा फायदा घेतोय हे आपण पाहिलं. आश्विन तर अनुभवी बॉलर आहे. अशावेळी काय करायच ते त्याला चांगल माहितेय,' असंही बुमराह म्हणाला.

ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर 

टीम इंडीयाचा यावेळचा ऑस्ट्रेलिया दौरा काहीसा वेगळा आहे. यावेळच्या कांगारूंच्या टीममध्ये नेहमीप्रमाणे चमक दिसत नाहीय. बॅटींग अथवा बॉलिंग कुठेच ती चुणूक दिसत नाहीय ज्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम ओळखली जाते.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा 235 चा स्कोर आणि 3 दिवसांची बॉलिंग यातून हे स्पष्ट होतंय. टीममध्ये आत्मविश्वाची कमतरता जाणवताना दिसतेय. 

19 वर 3 आणि 41 वर 4 विकेट गेल्यानंतर टीम इंडीयाने खेळात चांगले पुनरागम करत 250 ची धावसंख्या उभारली.

हा स्कोर ऑस्ट्रेलियासाठी काही मोठा नव्हता. पण पहिल्याच ओव्हरमध्ये एरॉन फिंच आऊट झाल्यानंतर त्यांची बॅटींग गडगडली.