आज भारत-ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणार तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना

दोन्ही संघांमधील तिसरा टी-20 सामना आज सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Updated: Dec 8, 2020, 10:34 AM IST
आज भारत-ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणार तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना title=

सिडनी : सलग दोन टी-20 सामने जिंकल्यानंतर मालिका जिंकणारा भारतीय संघ शेवटचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. तर शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूने यजमान संघ मैदानात उतरेल. पहिल्या 2 टी-20 सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघात उत्साह कायम आहे.

दोन्ही संघांमधील तिसरा टी-20 सामना आज सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.40 मिनिटांनी सुरु होईल. त्याआधी 1.10 मिनिटांनी टॉस होईल.

भारताने पहिला सामना आधी फलंदाजी करत तर दुसरा सामना आधी गोलंदाजी करत जिंकला होता. पहिल्या सामन्यात भारताने 161 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलिया पुढे ठेवले होते. दुसर्‍या सामन्यात हार्दिक पांड्याच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने 195 धावांचं लक्ष्य गाठत सामना जिंकला होता. या दौऱ्यात हार्दिक पांड्या मॅच फिनिशरच्या भूमिकेत आहे तर टी नटराजनने पदार्पणातून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र जसप्रीत बुमराहची गोलंदाजी इतकी प्रभावी ठरत नाहीये.

भारताकडे चांगले खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया संघात ही चांगले खेळाडू आहेत. पण अनेक जण दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. यजमान संघात शेवटच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्क खेळणार नाहीयेत. दुसर्‍या टी-२० सामन्यात कर्णधार अॅरोन फिंच खेळला नव्हता. आजही तो खेळणाक का याबाबत शंका आहे. मार्कस स्टोइनिसने पुनरागमन केले, परंतु त्याने अजून सिरीजमध्ये एकही बॉल टाकलेला नाही. यजमान संघाची गोलंदाजी इतकी प्रभावी ठरलेली नाही. अ‍ॅन्ड्र्यू टाय, डॅनियल सॅम्स आणि सीन एबॉट हे बॉलर इतके प्रभावी ठरलेले नाहीत.