Ind Vs Nz : टीम इंडिया आज न्यूझीलंडशी भिडणार, पण तुम्ही कुठे पाहणार हा सामना, जाणून घ्या

T20 World Cup : टीम इंडिया बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तयारी करण्याची भारतासाठी ही शेवटची संधी आहे. 

Updated: Oct 19, 2022, 11:26 AM IST
Ind Vs Nz : टीम इंडिया आज न्यूझीलंडशी भिडणार, पण तुम्ही कुठे पाहणार हा सामना, जाणून घ्या     title=

Ind Vs Nz Warm Up Match T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी (19 ऑक्टोबर) टीम इंडियाचा न्यूझीलंडचा (India vs New Zealand) दुसरा सराव सामना होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आज पुन्हा टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) वॉर्मअप अर्थात सराव सामना खेळवला जाणार आहे. सराव सामने विश्वचषकाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याने दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. तर आजच्या सामना कुठे असेल आणि कधी असेल याबाबत जाणून घेऊया... 

पहिल्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs NZ) यांच्यात पार पडलेल्या सराव सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि नंतर शेवटी मोहम्मद शमी यांनी चांगली खेळी खेळली... 

सामना कुठे आणि कधी सुरू होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात आहे. जिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला. भारतीय वेळेनुसार भारत-न्यूझीलंड सराव सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. टीम इंडियाचा हा दुसरा सराव सामना स्टार नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तसेच डिस्ने-हॉटस्टारवरून ऑनलाइन पाहता येईल.

वाचा : Team India तून बाहेर पडल्यानंतर 'या'  खेळाडूची तुफानी खेळी, 190 च्या स्ट्राइक रेटने... 

दोन्ही संघात कोण कोण?

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी
राखीव: शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई

न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरेल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन एलेन