Ind vs SA 3rd Test:काय आहे टीम इंडियाची रणनिती, विराटच्या खेळण्यावरही मोठी अपडेट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरी कसोटी उद्यापासून खेळली जाणार आहे.

Updated: Jan 10, 2022, 05:45 PM IST
Ind vs SA 3rd Test:काय आहे टीम इंडियाची रणनिती, विराटच्या खेळण्यावरही मोठी अपडेट title=

Virat Kohli Press Conference : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना (India vs South Africa 3rd Test) ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये (Cape Town) खेळवला जाणार आहे. कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) हा सामना खूप खास असेल. त्याच्या कारकिर्दीतील हा 99वा कसोटी सामना आहे. या सामन्यापूर्वी कोहलीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने स्वतःच्या फिटनेसबाबत महत्त्वाची महिती दिली, जी भारतीय टीमसाठी (Team India) दिलासा देणारी आहे. 

कोहली पूर्णपणे तंदुरुस्त
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोहली पत्रकार परिषदेत म्हणाला, 'मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि केपटाऊन कसोटी सामन्यात खेळणार आहे. कोहली खेळणार असला तरी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (mohammed siraj) मात्र या सामन्यात खेळू शकणार नाही. सिराज अद्याप दुखापतीतून सावरला नाही. 

जडेजा की अश्विन
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्याबद्दलही कोहलीनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जडेजाची अष्टपैलू कामगिरी संघासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. पण या मालिकेत अश्विनने चांगली कामगिरी केली आहे. जडेजा दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत अश्विन संघासाठी चांगली कामगिरी करत असल्याचं विराटने स्पष्ट केलं.

रहाणे, पुजारा खेळणार?
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) कामगिरीवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर विराट म्हणाला, 'पुजारे आणि रहाणेचा अनुभव संघासाठी अनमोल आहे. त्यांची ऑस्ट्रेलियातील कामगिरी आपण पाहिली आहे असं सांगत विराटने तिसऱ्या कसोटीत रहाणे आणि पुजारा खेळण्याचे संकेत दिले आहेत. 

केपटाऊनमध्ये निर्णायक सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. यात भारताला एका सामन्यात विजय तर दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना उद्यापासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. कसोटी मालिक जिंकण्यासाठी भारतासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.