पोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्टइंडीज पहिला वन डे, या चॅनलवर पाहा LIVE

 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानकडून फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये नवीन खेळी खेळण्यास सज्ज झाली आहे. आज भारतीय संघ आपल्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरूवात करणार आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 23, 2017, 04:05 PM IST
पोर्ट ऑफ स्पेन :  भारत-वेस्टइंडीज पहिला वन डे, या चॅनलवर पाहा LIVE  title=

नवी दिल्ली :  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानकडून फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये नवीन खेळी खेळण्यास सज्ज झाली आहे. आज भारतीय संघ आपल्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरूवात करणार आहे. 

पाच वन डे आणि एक टी-२० सामन्यांच्या या दौऱ्याची सुरूवात आज होणार आहे. पहिला सामना क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळण्यात येणार आहे.  हा सामना भारतीय प्रमाणवेळ सायंकाळी ६.३० मिनिटांनी दूरदर्शन, सोनी सिक्स आणि टेन स्पोर्ट्सवर दाखविण्यात येणार आहे. 

आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या ऐवजी अजिंक्य राहाणे भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावणार आहे. या सिरीजसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. राहणे सलामीला जाणार याचा अर्थ रिषभ पंत याला मध्यमक्रमावर आपला फलंदाजीची वाट पाहावी लागणार आहे.