वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा बॉलिंगचा निर्णय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Nov 4, 2018, 06:51 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा बॉलिंगचा निर्णय  title=

कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतानं लोकेश राहुल, दिनेश कार्तिक आणि मनिष पांडेला संधी दिली आहे. तर कृणाल पांड्या या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. रोहित शर्मानं कृणालला त्याची भारतासाठीची पहिली आंतरराष्ट्रीय कॅप दिली. या टी-२० सीरिजमध्ये भारत विराट आणि धोनीच्याशिवाय मैदानात उतरला आहे. धोनीच्याऐवजी ऋषभ पंतकडे विकेट कीपिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-०नं तर वनडे सीरिजमध्ये ३-१नं विजय झाला होता. आता आजपासून कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात ३ टी-२० मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे.

भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा