टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर महिला संघाचीही मोठी कामगिरी

अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये महिला भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. युएई संघाविरूद्ध 122 धावांनी मोठी विजय साकारला आहे.

Updated: Jan 16, 2023, 09:11 PM IST
 टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर महिला संघाचीही मोठी कामगिरी  title=

U-19 World Women Cup : अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये महिला भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. युएई संघाविरूद्ध 122 धावांनी मोठा विजय साकारला आहे. शेफाली वर्माच्या (Shafali varma) नेतृत्त्वाखाली भारतीय संघ खेळत असून युएईविरूद्ध बॅटिंग करताना 219 धावांचा डोंगर उभारला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना युएई संघाला निर्धारित 20 षटकात 5 विकेट्सवर 97 धावा करू शकला. (India Women U19 won by 122 runs Against UAE latest marathi Sport News)

श्वेता आणि शेफालीने सलामीला येत युएईच्या बालर्सची पिसे काढलीत. दोघींनी 111 धावांची सलामी दिली  यामध्ये शेफालीने 34 बॉलमध्ये 78 धावांची शानदार खेळी केली. शेफालीसह श्वेतानेही 49 बॉलमध्ये 79 धावा करत मजबूत सुरूवात करून दिली. शेफालीने आपल्या 78 धावांच्या खेळीमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार मारले. 

शेफाली बाद झाल्यावर आलेल्या रिचा घोषनेही फोडकाम चालू ठेवत 29 बॉलमध्ये 49 धावा केल्या. रिचाने 5 चौकार आणि 2 षटकार मारत दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. 20 षटकात संघाने 3 विकेट गमावत 219 धावा केल्या आहेत. युएई संघाने धावांचा पाठलाग करताना 17 धावांवर पहिला गडी बाद झाला. युएईकडून Mahika Gaur ने 26 आणि  Lavanya Keny 24 धावा केल्या. इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. 

दरम्यान, भारताच्या 220 धावांचा पाठलाग करताना युएईचा संघ 97 धावा करू शकला. महिला भारतीय संघाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत 4 पॉईंटसह आपलं पहिलं स्थान भक्कम केलं आहे.