World Cup जिंकण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय; 'या' गोष्टीवर घातली बंदी

Indian Players bans from trekking : धर्मशाला या निसर्गरम्य शहरात अनेक खेळाडू ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. पण टीम मॅनेजमेंटने (Indian team management) प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ट्रेकिंगला परवानगी नाही.

सौरभ तळेकर | Updated: Oct 24, 2023, 06:53 PM IST
World Cup जिंकण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय; 'या' गोष्टीवर घातली बंदी title=
Indian cricketers banned from trekking

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) वर्ल्ड कपदरम्यान भारतीय क्रिकेट संघाला धरमशाला येथे ट्रेकिंग (Indian Players bans from trekking) करण्यास बंदी घातली आहे. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना ट्रेकिंगला जाता येणार नसले तरी बाहेर जाता येईल असे कळवले. ट्रेकिंग तसेच पॅराग्लायडिंग देखील करता येणार नाही, असं टीम इंडियाच्या खेळाडूंना कळवण्यात आलं आहे. खेळाडूंच्या कराराचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा मॅनेजमेंटने नमुद केला. त्यामुळे आता खेळाडू देखील नाराज झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, बीसीसीआयचा हा निर्णय योग्य असल्याचं क्रिडातज्ज्ञांनी म्हटलं आहे.

धर्मशाला हे निसर्गरम्य ठिकाण आहे. अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी संपूर्ण भारतातून येतात. धर्मशाला या निसर्गरम्य शहरात अनेक खेळाडू ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. पण टीम मॅनेजमेंटने प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ट्रेकिंगला परवानगी नव्हती. अशातच आता आगामी सामन्यापूर्वी करायचं तरी काय? असा सवाल आता खेळाडूंना पडला आहे. टीम इंडियाचा आगामी सामना 29 तारखेला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. लखनऊच्या मैदानात हा सामना खेळवला जाईल. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध धर्मशालाच्या मैदानात सामना झाला होता. त्यामुळे अशा ठिकाणहून बाहेर जाण्याची इच्छा खेळाडूंना नाहीये, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बीसीसीआयने काय म्हटलं?

संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवलं आहे, की ते ट्रेकिंगला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे खेळाडू जखमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर जाऊ शकतात पण ट्रेकिंग करू शकत नाहीत. त्याच वेळी मालिकेदरम्यान कोणताही भारतीय खेळाडू पॅराग्लायडिंग देखील करू शकत नाही कारण ते खेळाडूंच्या कराराच्या विरोधात जाऊ शकतं, असं बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा - पाकिस्ताच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा Lungi Dance, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!

दरम्यान, भारताने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यामुळे आता उर्वरित चार सामन्यात टीम इंडियाची कामगिरी कशी असेल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उर्वरित सामन्यात टीम इंडिया इंग्लंड आणि साऊथ अफ्रिकेविरुद्ध भिडेल.