INDvsSL: लाजीरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणतो...

श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 10, 2017, 10:37 PM IST
INDvsSL: लाजीरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणतो... title=
Image: ANI

धरमशाला : श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय टीमला केवळ ११२ रन्स करता आल्या त्यामुळे या मॅचमध्ये श्रीलंकने सहजच विजय मिळवला. टीम इंडियाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर कॅप्टन रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टॉस जिंकून श्रीलंकन टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे बॅट्समन एकामागोमाग आऊट होत गेले आणि संपूर्ण टीम ११२ रन्स करुन पेवेलियनमध्ये परतली. त्यानंतर श्रीलंकेच्या टीमने अवघ्या २०.४ ओव्हर्समध्येच ११४ रन्स करत विजय मिळवला. 

"आम्ही बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. जर आम्ही ७०-८० रन्स केले असते तर परिस्थिती काही वेगळी असती. या परिस्थितीत चांगलं प्रदर्शन करणं खूपच महत्वपूर्ण आहे. आजच्या या पराभमावमुळे आम्ही एक धडा शिकलो आहोत. तसेच आमचे डोळेही उघडले आहेत. आता आम्हाला पुन्हा चांगली कामगिरी करायची आहे" असं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

रोहित शर्माने पुढे म्हटलं की, "जर महेंद्रसिंग धोनीला आणखीन एका बॅट्समनने साथ दिली असती तर स्कोर आणखीन वाढला असता. ज्यावेळी आम्ही बॉलिंग करत होतो त्यावेळी पीचचा फायदा आम्हालाही झाला. मात्र, ११२ रन्स विजय मिळविण्यासाठी कमी होते.

विराट कोहलीच्या अनुपस्थित हा चांगला अनुभव नव्हता. आम्हाला कुठल्याच मॅचमध्ये पराभूत व्हायचं नाहीये. आता आगामी दोन मॅचेसमध्ये आम्हाला आमचं चांगलं प्रदर्शन दाखवायचं आहे असंही रोहितने म्हटलं.