शोधू कुठं....; जोरदार Sixer ठोकल्यानंतर चेंडू हरवला; माहीची शोधाशोध

सराव असला तरीही तो यामध्ये सामन्याच्याच स्तराचं गांभीर्य दाखवत तयारी करत आहे. 

Updated: Aug 24, 2021, 10:25 PM IST
शोधू कुठं....; जोरदार Sixer ठोकल्यानंतर चेंडू हरवला; माहीची शोधाशोध  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : आयपीएल (IPL 2021) चं पुढील पर्व सुरु होण्यापूर्वी दुबईमध्ये पोहोचलेला चेन्नईचा संघ सध्या Chennai Super Kings (CSK) मैदानावर चांगलाच सरावाला लागला आहे. आयपीएलचं हे पर्व गाजवण्यासाठीच चेन्नईचे खेळाडू प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. 

एकिकडे संघातील खेळाडू तयारीला लागलेले असतानाच दुसरीकडे माही, म्हणजेच महेंद्रसिंह धोनी त्याच्या कौशल्याच आणखी भर टाकताना दिसत आहे. तुफानी आणि वेळ पडल्यास संयमी खेळी करणाऱ्या माहिनं त्याच्या फलंदाजीच्या सरावाला सुरुवात केली असून, सराव असला तरीही तो यामध्ये सामन्याच्याच स्तराचं गांभीर्य दाखवत तयारी करत आहे. 

मंगळवारी चेन्नईच्या संघानं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला, या व्हिडीओमध्ये माही अतिशय ताकदीने चेंडूवर फटका मारत तो थेट सीमारेषेपलीकडे धाडताना दिसत आहे. माहिची ही फटकेबाजी सुरु असताना एका षटकारामुळं तर चेंडूच कुठे कोपऱ्यात जाऊन बसतो. ज्यानंतर माही आणि त्याच्या संघातील इतरही खेळाडू झाडाझुडपांमध्ये चेंडू शोधताना दिसत आहेत. 

खेळाडूंनी एका चेंडुसाठी केलेली ही शोधाशोध पाहता, नेटकऱ्यांनी या व्हिडीओचा चांगलाच आनंद घेतल्याचं कळत आहे. हजारोंच्या संख्येनं या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले असून, त्यावर अनेकांनी कमेंट करत 'थाला' म्हणजेच माहिच्या या फटकेबाजीचं कौतुक केलं आहे.