IPL 2021, Chennai vs Kolkata | फॅफ डु प्लेसीसचा अफलातून रिले कॅच, पाहा व्हीडिओ

 चेन्नईचा आक्रमक फलंदाज फॅफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) बाऊंड्री लाईनवर अफलातून रिले कॅच (Relay Catch) घेतला.  

Updated: Sep 26, 2021, 05:55 PM IST
 IPL 2021, Chennai vs Kolkata | फॅफ डु प्लेसीसचा अफलातून रिले कॅच, पाहा व्हीडिओ  title=

दुबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021 Match 38th) 38 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येत आहे. कोलकाताने टॉस जिंकत पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईचा आक्रमक फलंदाज फॅफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) बाऊंड्री लाईनवर अफलातून रिले कॅच (Relay Catch) घेतला. फॅफने कोलकाताचा कर्णधार इयोन मॉर्गनचा (Eoin Morgan) हा भन्नाट कॅच घेतला. हा कॅच घेतल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय. (Ipl 2021 Match 38th Chennai vs Kolkata faf du plesis take super relay catch of eoin morgan)

अशी घेतली कॅच 

सामन्यातील 10 वी ओव्हर जोश हेझलवूड टाकत होता. या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर इयोनने लॉन्ग ऑनच्या दिशेने फटका मारला. तिथे फॅफ उभा होता. इयोनने  आपल्या दिशेने येत असलेला चेंडू पाहिला. तो सावध झाला. फॅफने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. मात्र यानंतर फॅफ 2 पावलं मागे गेला.  

मागे बाऊंड्री असल्याचं फॅफच्या लक्षात आलं. तेवढ्यात फॅफने बॉल हवेत उडवला. सीमारेषेच्या बाहेर गेला. पुन्हा आत येत बॅल्नस राहत सुपर कॅच पूर्ण केला. दरम्यान फॅफने असा कॅच घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही फॅफने असा कारनामा केला आहे.    

चेन्नईला 172 धावांचे आव्हान

कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. यामुळे चेन्नईला विजयाासाठी 172 धावांचे आव्हान मिळाले आहे.  
 
चेन्नई प्लेइंग इलेव्हन : फॅफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), मोईन अली, रवींद्र जाडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जोश हेजलवूड

कोलकाताचा अंतिम 11 संघ : शुबमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कॅप्टन), व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसन.