IPL 2021 | 'कॅप्टन कूल' धोनीने सांगितलं राजस्थान विरुद्धच्या पराभवाचं कारण, म्हणाला...

राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नईच्या किंग्सचा (CSK)  7 विकेट्सने पराभव केला.  

Updated: Oct 3, 2021, 05:28 PM IST
IPL 2021 | 'कॅप्टन कूल' धोनीने सांगितलं राजस्थान विरुद्धच्या पराभवाचं कारण, म्हणाला... title=

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021 Match 47th) 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नईच्या किंग्सचा (CSK) पराभव केला. चेन्नईने राजस्थानला ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) शतकी खेळीच्या जोरावर विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendrasingh Dhoni) पराभवाचं कारण सांगितलं. तसेच शतकवीर ऋतुराजचंही कौतुक केलं. (ipl 2021 match 47 chennai super kings captain mahendra singh dhoni reacts after loss against rajasthan royals)

धोनी काय म्हणाला? 

"नाणेफेकीचा कौल आमच्या बाजूने लागला नाही,  हे आमच्यासाठी वाईट होतं. विजयासाठी दिलेलं 190 धावांचं हे परफेक्ट होतं. पण दवामुळे खेळपट्टीवर परिणाम झाला. यामुळे चेंडू बॅटवर सहजपणे येत होता. अशा वेळेस चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याची आवश्यकता होती. राजस्थानच्या फलंदाजाने अचूकपणे बॅटिंग करत गोलंदाजांवर दबाव बनवला. राजस्थाने पहिल्या 6 ओव्हरमध्येच आम्हाला पछाडलं होतं", असं धोनीने सामना संपल्यानंतर म्हंटलं.

ऋतुराजचं कौतुक

ऋतुराजने राजस्थान विरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं. या खेळीसाठी धोनीने ऋतुराजचं कौतुक केलं. "राजस्थानचे फिरकी गोलंदाजी करत होते तेव्हा चेंडू थांबून थांबून येत होता. त्यानंतर चेंडू बरोबर येत होता. ऋुतुराजने अफलातून फलंदाजी केली. जेव्हा सामन्यात पराभव होतो, तेव्हा अशा शतकी खेळींकडे आपोआप दुर्लक्ष होतं. मात्र ऋुतुराजची शानदार खेळी केली, असं धोनीने नमूद केलं."