IPL 2021, MI vs KKR | 'हिटमॅन' रोहित शर्माचा भीमपराक्रम, ठरला आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज

विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स, महेंद्रसिंह धोनीसारख्या धडाकेबाज फलंदाजांना न जमलेला कारनामा हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) करुन दाखवलाय. 

Updated: Sep 23, 2021, 10:06 PM IST
IPL 2021, MI vs KKR | 'हिटमॅन' रोहित शर्माचा भीमपराक्रम, ठरला आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज title=

यूएई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत 4 फोरच्या मदतीने 33 धावांची खेळी केली. रोहितने या खेळीसह किर्तीमान रचला आहे. विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स, महेंद्रसिंह धोनीसारख्या धडाकेबाज फलंदाजांना न जमलेला कारनामा हिटमॅनने केलाय. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात एका टीम विरुद्ध 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (IPL 2021 Mi vs kkr 34th Match mumbai indians rohit sharma becomes 1st batsman who scored 1000 runs against  any team in IPL) 

रोहितने 18 वी धाव पूर्ण करताच हा पराक्रम केलाय. रोहितला या सामन्याआधी 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 18 धावांची आवश्यकता होती. रोहितने यासह आणखी एक विशेष कामगिरी केलीय. रोहितने 5 हजार 500 धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहितच्या नावावर आता आयपीएलमध्ये 5 हजार 513 धावा आहेत.

डिकॉकसोबत झोकात सुरुवात

कोलकाताने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. या बॅटिंगसाठी क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा सलामी जोडी मैदानात आली. मैदानात येताच दोघांनी कोलकाताच्या गोलंदाजांना चोपायला सुरुवात केली. या दोघांनी अवघ्या पावरप्ले आधीच अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. यानंतर या दोघांनी आणखी वेग धरला. या सलामी जोडीने 78 धावांची भागीदारी केली. 

कोलकाताला विजयासाठी 156 धावांचे आव्हान

मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. यामुळे कोलकाताला विजयासाठी 156 धावांचे आव्हान मिळाले. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्यानंतर रोहितने 33 रन्स केल्या. तर अखेरच्या ओव्हरमध्ये कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्या या दोघांनी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. 

तर कोलकाताकडून लॉकी फर्ग्यूसन आणि प्रसिद्ध क्रिष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर सुनील नारायणने 1 विकेट घेतली. दरम्यान आता मुंबईचे गोलंदाज कशाप्रकारे 156 धावांचा बचाव करतात, याकडे लक्ष असणार आहे.