MS धोनी आणि विराट कोहली पेक्षाही वजनदार या खेळाडूची बॅट, जाणून घ्या रंजक गोष्ट

धोनीची एक बॅट वर्ल्ड कपनंतर लाखो रुपयांना विकली गेली होती. पण माही आणि विराट कोहली सध्या वापरत असलेल्या बॅटविषयी तुम्हाला ही खास गोष्ट माहिती आहे का?

Updated: Apr 11, 2021, 04:40 PM IST
MS धोनी आणि विराट कोहली पेक्षाही वजनदार या खेळाडूची बॅट, जाणून घ्या रंजक गोष्ट title=

मुंबई: IPLची धूम सुरू आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू झाला. त्यानंतर दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली. आज तिसरा सामना कोलकाता विरुद्ध हैदराबाद चेपॉकवर होत आहे. IPLच्या पहिल्या सामन्य़ात पहिलं असेल की कृणाल पांड्याची बॅट तुटल्याचे फोटो समोर आले होते. पण कधी असा विचार केला आहे का महेंद्र सिंह धोनी किंवा विराट कोहली सध्या वापरत असलेली बॅट कशी असेल? त्याचं काय वैशिष्ट्य असेल. यंदा IPLच्या निमित्तानं एक रंजक गोष्ट समोर आली आहे. विराट कोहली आणि धोनी पेक्षाही एका खेळाडूची बॅट खूप वजनदार आहे. 

अर्थात वजनदार या शब्दाचा अर्थ अधिक धावा काढण्यात अशा अर्थानं नाही तर खऱ्या अर्थानं जास्त वजन असलेली आहे. याआधी आपण ऐकलं असेलच 2011चा वर्ल्डकप टीम इंडियानं जिंकल्यानंतर त्यावेळी धोनीनं वापलेली बॅट तब्बल 72 लाख रुपयांना गेली होती. या बॅटवर बोली लावण्यात आली होती. या बॅट कशा तयार केल्या जात असतील आणि त्या सामान्य बॅट प्रमाणेच असतील का असा प्रश्नही लगेचच तुमच्या डोक्यात आला असेल.

तुम्हाला माहिती आहे का? सर्वसामान्य खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या बॅटपेक्षा क्रिकेटपटूंची बॅट खूप वेगळी असते. ती प्रत्येक खेळाडूनुसार तयार करून घेतली जाते. त्याची उंची रुंदी आणि वजन हे वेगवेगळं असू शकतं. साधारणपणे क्रिकेट सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वसाधारण बॅटची लांबी 38 इंच तर रुंदी 4.25 असते. त्यासाठी तयार करण्यात आलेली मूठ ही वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जाड किंवा बारिक ही खेळाडूनुसार असते. 

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या बॅटचं वजन 1100-1250 ग्रॅम आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या बॅटचं वजन धोनीच्या बॅट इतकंच साधारण  1100-1230 ग्रॅम आहे. या दोघांपेक्षाही अधिक वजनाची बॅट पंजाब किंग्सचा खेळाडू वापरतो. पंजाब संघातील ख्रिस गेलच्या बॅटचं वजन साधारणपणे 1100-1300 ग्रॅम इतकं आहे. 

चेन्नई सुपरकिंग्स संघातील सुरैश रैनाची बॅट विशिष्ट पद्धतीनं तयार करण्यात आली आहे. ही बॅट स्पिनगर बॉल खेळणाऱ्यासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. त्या बॅटची मूठ (जिथे बॅट पकडली जाते) ही तयार करण्याची पद्धतही वेगळी आहे. सुरुवातीला आणि शेवटी हा भाग निमुळता आहे तर मधला भाग जाड ठेवण्यात आला आहे.