IPL 2021, Delhi vs Chennai Qualifier 1 | दिल्ली विरुद्ध चेन्नई आमनेसामने, थेट अंतिम सामन्यात कोण पोहचणार?

चेन्नईने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Updated: Oct 10, 2021, 07:24 PM IST
IPL 2021, Delhi vs Chennai Qualifier 1 | दिल्ली विरुद्ध चेन्नई आमनेसामने, थेट अंतिम सामन्यात कोण पोहचणार? title=

यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला क्वालिफायर सामन्यात दिल्ली विरुद्ध चेन्नई आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नईने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीला पहिले बॅटिंग करावी लागणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम सामन्याचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत संघाला फायनलसाठी आणखी एक संधी मिळेल. मात्र  तसं न करता थेट हा सामना जिंकूनच अंतिम फेरीत पोहचण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. (IPL 2021 Qualifier 1 Chennai super kings vs Delhi capitals head to head record)

दोघांपैकी वरचढ कोण?

आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ एकूण 25 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई वरचढ ठरली आहे. चेन्नईने दिल्लीचा  15 सामन्यात पराभव केला आहे. तर दिल्लीने 10 वेळा विजय मिळवला आहे. लीग स्टेजमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे आकड्यांपेक्षा या सामन्यात कोण धमाका करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

अशी आहे दोन्ही टीमचे प्लेइंग इलेव्हन :  

दिल्ली कॅपिट्ल्स :  शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार),  टॉम करन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, खगिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिच नॉर्तजे.  

चेन्नई :  ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जोश हेझलवूड