विराट कोहलीच्या प्रॅक्टिस व्हिडीओवर शाहिद आफ्रिदीकडून कमेंट, म्हणला "नेहमी सराव करताना आपले..."

आरसीबीची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

Updated: Oct 6, 2021, 07:17 PM IST
विराट कोहलीच्या प्रॅक्टिस व्हिडीओवर शाहिद आफ्रिदीकडून कमेंट, म्हणला "नेहमी सराव करताना आपले..." title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज आमना सामना होणार आहे. आरसीबीची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. SRH आता आपला सन्मान वाचवण्यासाठी उर्वरित सामने खेळेल. परंतु तो हे सामने जिंकला तरी याचा त्यांच्या पॉईंट टेबलवरती काहीही परिणाम होणार नाही.

परंतु आरसीबीला आता उर्वरित दोन सामने जिंकून गुणतालिकेत (Point table) अव्वल -2 पदांवरती मध्ये स्थान मिळवायचे आहे. SRH विरुद्धच्या सामन्याआधी विराटने त्याच्या सराव सत्राचा एक व्हिडीओ ट्विट केला, ज्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने कमेंट केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.

फलंदाजी सरावादरम्यान विराटने जबरदस्त फलंदाजी केली आहे. ज्याचा त्याने ट्वीटरवरती व्हिडीओ शेअर केला आहे. यावर आफ्रिदीने कमेंटमध्ये लिहिले, "बघून छान वाटेल, एक महान खेळाडू नेहमी सराव करताना आपले १०० टक्के देतो."

RCB बद्दल बोलायचे झाले तर, संघाने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांपैकी आठ सामने जिंकले आहेत. आरसीबीने 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात 20 गुण आहेत, तर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या खात्यात 18 गुण आहेत.

CSK आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रत्येकी एक एक सामना आहे, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे कमाल 22 गुण आणि किमान 20 गुण असतील. त्याच वेळी, CSK कमाल 20 आणि किमान 18 गुण असेल. जर आरसीबीकडे अजून दोन सामने खेळण्याची संधी आहे, त्यामुळे त्यांनी जर त्यांचे दोन्ही सामने जिंकले, तर आरसीबीला टॉप -2 मध्ये येईल.