IPL 2021: RCBकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात, विराट कोहलीनं सांगितला प्लॅन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कोरोना काळात आपल्या जर्सीचा रंग बदलला आहे. यापुढचे सर्व सामने नव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळले जाणार आहेत. 

Updated: May 2, 2021, 07:11 PM IST
IPL 2021: RCBकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात, विराट कोहलीनं सांगितला प्लॅन title=

मुंबई: देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने मदतीसाठी हात पुढे केला आहे. तर IPLमधील अनेक खेळाडूंनी भारतीयांसाठी या कठीण काळात मदत करण्याचा वसा घेतला आहे. कोणी ऑक्सिजनसाठी तर कोणी पीएम केअर फंडमधून पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता किंग कोहलीचा संघ आणि राजस्थान रॉयल्सची फ्रांचायझीने देखील मदतीचा हात पुढे केला आहे.

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजची कमतरता, बेड मिळत नसल्याने खूप मोठी समस्या निर्माण होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आरसीबीने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रांनचायझीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आता लाल ऐवजी निळ्या जर्सीमध्ये या पुढचे सामने खेळताना दिसणार आहे. ही जर्सी फ्रंटलाइनवर काम करणाऱ्यांसाठी समर्पित करण्यात आली आहे. तर आरसीबीचे खेळाडू आपल्या जर्सीवर स्वत:ची सही करून त्याचा लिलाव देखील करणार आहेत.

या जर्सीच्या लिलावातून जमा झालेले पैसे कोरोना काळात ऑक्सिजन, बेड्सची कमतरता आणि अन्य गोष्टींना मदत करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतील असं कर्णधार विराट कोहलीने एका ट्वीटरद्वारे माहिती दिली आहे.